Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayधोनी बनला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पचा पाहुणा...गोल्फ खेळताना व्हीडिओ व्हायरल...

धोनी बनला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पचा पाहुणा…गोल्फ खेळताना व्हीडिओ व्हायरल…

न्युज डेस्क – भारतीय क्रिकेट संघाच्या महान कर्णधारांपैकी एक महेंद्रसिंग धोनीचे केवळ भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत. धोनीने क्रिकेटमध्ये अनेक यश संपादन केले आहे. एकदिवसीय विश्वचषक, टी-20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा तो एकमेव कर्णधार आहे. धोनीला फक्त क्रिकेट आवडते असे नाही.

या खेळाशिवाय त्याला इतरही अनेक खेळ आवडतात. धोनीचे पहिले प्रेम फुटबॉल आहे. याशिवाय टेनिस आणि गोल्फ खेळण्याची संधीही तो सोडत नाही. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार नुकताच यूएस ओपन टेनिस स्पर्धेतील कार्लोस अल्काराझचा सामना पाहण्यासाठी आला होता. आता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतचा त्यांचा एक फोटो व्हायरल होत आहे.

खरंतर धोनी सध्या अमेरिकेत आहे. यूएस ओपनचे सामने पाहण्याबरोबरच त्याने गोल्फचाही आनंद लुटला. यादरम्यान माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प देखील धोनीसोबत दिसले. दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. भारताच्या माजी कर्णधाराला अमेरिकेच्या माजी राष्ट्रपतींनी ट्रम्प नॅशनल गोल्फ क्लब, बेडमिन्स्टर येथे गोल्फ खेळण्यासाठी आमंत्रित केले होते.

धोनीचे जवळचे सहकारी आणि उद्योगपती हितेश संघवी यांनी इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आणि लिहिले, “धोनी, डोनाल्ड ट्रम्प आणि राजीव नाईक यांच्यासोबत गोल्फ. आम्हाला होस्ट केल्याबद्दल माजी राष्ट्रपतींचे आभार.”

त्याच्या एका इंस्टाग्राम स्टोरीमध्ये सांघवीने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये धोनी आणि ट्रम्प दोघेही एकत्र गोल्फ खेळताना दिसत आहेत.

दुबईस्थित उद्योगपती संघवी एमएस धोनीसोबत होता आणि त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर भारताच्या माजी कर्णधारासोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत.धोनी आणि ट्रम्प दोघेही एकत्र गोल्फ खेळताना व्हिडिओ x (ट्विटर) वर व्हायरल होत आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: