- अकोला स्थानांतरित केलेल्या महिलेची रस्त्यातच प्रसूती…
- पातूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बाळ आणि आई सुखरूप…
- पतीने केली जिल्हा आरोग्य अधिकारी आणि पातुर वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे तक्रार…
पातुर – निशांत गवई
पातुर तालुक्यातील मळसुर प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार ढेपाळला असून प्रसूती योग्य महिलेला अकोला स्थानांतरित केल्यामुळे सदर महिलेला अकोला येथे नेत असताना रस्त्यातच तिची प्रसूती झाली त्यामध्ये 108 रुग्णवाहिकेचा डॉक्टर उपस्थिती विना आशासेविकेने प्रसूती केली बाळ आणि आई पातुर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येसुखरूप आणून पोहोचविले रस्त्यातच प्रसूती झाल्याने पतीने जिल्हा आरोग्य अधिकारी आणि पातुर तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे मळसुर येथील दोन परिचारिका आणि डॉक्टर यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की दिनांक 22 /६/2023 ला तालुक्यातील उमरा गावातील गोपेश आत्माराम अल्हाट यांच्या पत्नीला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या आणि पोटामध्ये वेदना होऊ लागल्याने त्यांनी पत्नीला घेऊन मळसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले तेव्हा तेथील कर्तव्यावर असलेले डॉक्टर इफ्तेखार नय्यार तथा परिचारिका तायडे आणि कुऱ्हे मॅडम यांनी सदर महिलेला अकोला येथे स्थानांतरित केले.
पत्नीला घेऊन 102 रुग्णवाहिकेने आलेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेले त्यानंतर 108 रुग्नवाहीके मध्ये अकोला येथे नेत असताना सदर महिलेला रस्त्यातच खूप वेदना सुरू झाल्या त्यावेळी रुग्णवाहिकेमध्ये डॉक्टर फुरकान यांची उपस्थिती नसताना आशा सेविका उज्वला रमेश लाड या सेविकेने त्या महिलेची रस्त्यातच प्रसूती केली आणि बाळ आणि आईला पातूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुखरूप आणले सदर प्रकरणीप्रसूती झालेल्या महिलेच्या पतीने जिल्हा आरोग्य अधिकारी आणि पातुर तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून यामध्ये मळसुर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिका तायडे मॅडम आणि कुऱ्हे मॅडम तसेच डॉक्टर इफ्तेखार यांनी जबाबदारीचे घोंगडे झटकले या प्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी तक्रारीतून केली आहे.
प्रथम प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचया बाळाची योग्य स्थिती नसल्यामुळे प्रसूती करण्यामध्ये अडचणी येत असल्यामुळे सदर महिलेला अकोला येथे स्थानांतरित केले. आसोलकर जिल्हा आरोग्य अधिकारी: सातव्या महिन्यामध्ये सोनोग्राफी केली असता पोटातील बाळाची स्थिती पायाकडून होती मात्र नंतर पुन्हा नव्या महिन्यांमध्ये सोनोग्राफी केली,
असता बाळाची स्थिती चांगली होती मात्र मळसुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील परिचारिका तायडे मॅडम आणि कुऱ्हे मॅडम तथा डॉक्टर ईफत्तीयार खा नय्यार खा यांनी प्रसूती योग्यरितीने होत असताना सुद्धा ते केली नाही आणि आपल्या जबाबदारीचे घोंगडे झटकले आणि आम्हाला अकोला येथे जायचं सांगितले महिलेची नातेवाईक.