Sunday, November 17, 2024
Homeराज्यधनगर आरक्षण अंमलबजावणीप्रश्नी उपोषण केलेल्या बांधवांचा सांगली येथे सत्कार...

धनगर आरक्षण अंमलबजावणीप्रश्नी उपोषण केलेल्या बांधवांचा सांगली येथे सत्कार…

सांगली – ज्योती मोरे

चौंडी येथे २१ दिवस यशवंत सेनेच्या वतीने उपोषण केलेले उपोषनकर्ते मा. आण्णासाहेब रुपनवर आणि यशवंत सेना अध्यक्ष मा. बाळासाहेब दोलतडे तसेच चौंडी उपोषणास पाठिंबा देणेसाठी मिरी ता. पाथर्डी, दिहिवडी ता. माण, उदगाव ता. शिरोळ येथील बांधवांचा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक सांगली येथे सत्कार, धनगर आरक्षणाचा जागर, आरक्षण न्यायालयीन लढा याबाबत कार्यक्रम घेणेत आला.

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन सत्कारमुर्तींच्या हस्ते दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. पुंडलिकतात्या गडदे, मा. शंकर वगरे, मा. विष्णू माने, मा. मनगुआबा सरगर, मा. गजाननआबा आलदर, मा. संजयजी यमगर, मा. विठ्ठलतात्या खोत, मा. विक्रम ढोणे, ज्ञानदेव ढोमाणे, शिवाजीबुवा गावडे, यांचे हस्ते सर्व सन्माननीय बाळासाहेब दोलतडे, आण्णासाहेब रुपनवर, नरुटे साहेब,

पांडुरंग मेरगळ, नितिन कटरे, वैभव गोरड , सुरेश गोरड, शरद गोरड, संदिप गावडे, अमोल मरळे, दिलीप ठोंबरे, मल्लाप्पा धनगर यांचा मानाचा फेटा, राजमाता यांची फोटोप्रतिमा, शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

ज्यांची महाराजा यशवंतराव होळकर यांचा पहिला पोवाडा रचला आणि पुस्तक रुपाने प्रकाशात केला असे कोल्हापूरचे शाहिरविशारद डाॅ आझाद नाईकवडी यांनी आरक्षणाचे जनक राजर्षी शाहु महाराज यांचा पुतळा देवून उपोषनकर्त्यांचा सत्कार केला.

धनगर आरक्षण सध्यस्थिती, सरकारची आणि राजकारण्यांची आरक्षणाविषयक मानसिकता, राजकीय परिवर्तनाची दिशा, ओबीसींचे आरक्षान आणि जातनिहाय जनगणना अशा विषयांवर मा. पुंडलिकतात्या गडदे, मा. बाळासाहेब दोलतडे, मा. पांडुरंग मेरगल, मा. आझाद नाईकवडी, मा. आण्णासाेब रुपनवर, मा. विक्रम ढोणे, मा. शरद गोरड,

मा. नितिन कटरे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मा सुरेश पांढरे, दादासाो दुधाळ, तानाजी दुधाळ, अनिल कोळेकर, अमर पुजारी, महेश मासाळ, राजेंद्र दुधाळ, अमर पुजारी, सागर माने, डाॅ. इश्वर यमगर, संदिप हजारे, पिंगळे सर, बंडगर सर, बाळासाहेब गडदे, उद्यो. सागर माने कोल्हापूर. शिवाजी शेंडगे, बाळासाहेब खांडेकर, बिरु कोळेकर,

दरिबा बंडगर, दत्तात्रय यमगर, सुरेश शिंदे, शरद शिंदे, बिरु काळे आदी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक निवांत कोळेकर, सुत्रसंचलन बाबासाो माने तर आभार मा. अमोल पांढरे यांनी मानले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: