Monday, December 23, 2024
Homeराज्यआदिवासी समाजात धनगर समाजाचा समावेश नको, आदिवासी विकास परिषदेची मागणी...

आदिवासी समाजात धनगर समाजाचा समावेश नको, आदिवासी विकास परिषदेची मागणी…

पातूर – निशांत गवई

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यासाठी तत्काळ निर्णय घ्यावा म्हणून राज्यशासनाला पत्र दिले आहे. मुळात धनगर व धनगड ही दोन्ही शब्द अनुसूचित जमातीच्या सूचित नाहीत. त्यामुळे धनगर समाजाचा समावेश आदिवासी समाजात करु नये, अशी मागणी आदिवासी विकास परिषदेने दिलेल्या निवेदनाद्वारे पातूर तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांचेकडे करण्यात आली आहे.

धनगड या शब्दांचे भाषांतर धनगड असे केले जात आहे. ओरान, पांगढ या जमातीशी धनगर जातीचा तिळमात्रही संबंध नाही. धनगर ही जात आहे, जमात नाही. धनगर आदिवासी नाहीत. धनगर समाजाला घटनेनुसार 3.5 टक्के स्वतंत्र आरक्षण देण्यात आले आहे.

धनगर समाज एक पुढारलेला व शहरी भागात राहणार असून आदिवासीची संस्कृती ही विशिष्ट व स्वतंत्र आहे. आदिवासी जीवनशैली, संस्कृती, रितीरिवाज, रूढीपरंपरा, भाषा स्वतंत्र आहे. धनगर समाज आदिवासीच्या कोणत्याही निकषात बसत नाही. तरीही राजकीय फायद्यासाठी काही गैर आदिवासी लोकप्रतिनिधीकडून धनगर समाजाला अनुसुचित जमातीत घुसविण्यासाठी असंवैधानिक मागणी करण्यात येत आहे.

त्या प्रकाराचा आम्ही निषेध करतो, असेही पातूर तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आदिवासीचे आरक्षण हे संविधानिक हक्क असून त्यामध्ये कोणत्याही अन्य जातीची घुसखोरी करू नये. आदिवासी समाजाला ख-या अर्थाने सात टक्के आरक्षण अद्याप मिळालेले नाही. कारण आधीच आदिवासी समाजात गैर आदिवासीनी, बोगस आदिवासीची घुसखोरी झाली आहे.

आदिवासींचा विकास होण्यासाठी आदिवासीचे आरक्षण हे आदिवासी लोकांनाच मिळाले पाहिजे. म्हणून आदिवासीच्या आरक्षणात धनगर समाजाचा समावेश करण्यात येऊ नये, अशी मागणी भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली व पातूर तालुक्यातील सर्व आदिवासी बांधव यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

यावेळी सुधाकर शिंदे गोपाल रामकृष्ण लोखंडे सै.अर्चना सुधाकर शेंदे संतोष देवबा गिर्हे दसरत नारायण मेटगे आकाश भगवान करवते संतोष जयराम डाखोरे लक्ष्मण दसरत शेंदे सुरज सहदेव काळपांडे देवीदास उत्तम पांडे आरिग पुणाजी सोनोने प्रीतम सेनाजी खुळे राजेश श्री भोकरे रोशनी लक्ष्मण डाखोरे शुभम विलास करवते संगीत प्रकाश चवरे लक्ष्मी विलास करवते चंद्रकला लक्ष्मण डाखोरे जयश्री किशोर मेटोगे संतोष प्रल्हाद भुरकाडे लखन सिताराम डाखोरे लक्ष्मण सिताराम डाखोरे दिपक हिरामन डाखोरे आदी बांधव उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: