Friday, November 15, 2024
Homeराज्यएकनिष्ठा गौ-रक्षकांनी आपल्या जिवाची पर्वा न करता गौ-ला दिले जिवनदान...

एकनिष्ठा गौ-रक्षकांनी आपल्या जिवाची पर्वा न करता गौ-ला दिले जिवनदान…

खामगांव : गौ-सेवेत सदैव अग्रेसर असलेल्या एकनिष्ठा गौ-सेवा फाऊंडेशनच्या गौ-रक्षकांनी दिले एका बेवारस गौ-मातेला नवीन जिवनदान सविस्तर माहिती अशी आहे की सावजी ले-आऊट येथे एका बेवारस गायीचा तोंड लोखंडाच्या डब्यात गेल्या १७ दिवसा पासून फसून अडकलेला होता. त्यामुळे तिला चारा पाणी खात पिता येत नव्हते भरपूर लोकांनी गायीला पकण्यासाठी गेल्या १७ दिवसा पासून प्रयत्न केले गाय मारकी आणि शरीराने धाकड असल्यामुळे हातात येत नव्हती शेवटी एकनिष्ठा गौ-रक्षकांनी काल दिनांक २५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता पासून रेस्क्यू सुरू केला त्या गायीचा पाठलाग करून तब्बल ४ तासा नंतर २ वाजता तिला श्री स्वामी समर्थ केंद्रा समोरील खुल्या प्लॉट वर झाडी झुडपा मध्ये पकडण्यात यश आले.

व गायीच्या तोंडातला लोखंडाचा डब्बा काढताच भरपूर जखमा होऊन त्यामध्ये आळ्या पडले होते. या रेस्क्यु मध्ये एकनिष्ठा गौ-रक्षक सुरजभैय्या यादव सागर बेटवाल यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता बेवारस गाईवर नियंत्रण मिळविले यात सागर बेटवाल यांचा डावा पाय फैकचर झाला. लगेच डॉ. ऋषीकेश बोरे यांना बोलावून गायी वर उपचार केले या गौ-सेवेत संतोष अढाव, गोपाल अढाव, मयुर खेडकर, सोपान कान्हेरकर, बंडु राठोड, सुरेश इंगळे, प्रदीप शम्मी, मयुर पंजवाणी, ललित सोनी, जितेंद्र मच्छरे, संतोष खंडारे, विशाल बर्डे, यादवसिंग बोराडे, हितेश छंगानी, राजु शर्मा, हर्ष शर्मा आदि गौ- रक्षकांनी सहकार्य केले व तसेच श्री स्वामी समर्थ केंद्र येथे गायीवर उपचार सुरू आहे या गौ-सेवेत लागणारा खर्च एकनिष्ठा गौ-सेवकांनी केला अशी माहिती संतोष अढाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: