शिवभक्तांना ८ मार्चला अंबाखोरीत निशुल्क प्रवेश…
रामटेक – राजु कापसे
महाशिवरात्री ला एक दिवसा करीता काही शर्थी व अटीच्या आधारे वनविभाग भाविकांना अंबाखोरीत भोले बाबाची पूजा पाठ व दर्शन घेण्याची परवानगी देत असते. या वर्षी महाशिवरात्र शुक्रवार दि.८ मार्च रोजी येत असल्याने या एक दिवसाची परवानगी वन विभागाद्वारे देण्यात आली आहे.
हा महाशिवरात्री कार्यक्रम अंबाखोरी चॅरिटेबल ट्रस्टचे रामविलास शर्मा यांचे मार्फत दरवर्षी घेण्यात येतो.भाविकांना सिल्लारी गेट वरून सकाळी सूर्योदय ते सूर्यास्त पर्यंतच प्रवेश देण्यात येणार आहेत. हा प्रवेश फक्त चार चाकी वाहनांना देण्यात येणार आहेत. ज्या भाविकांकडे चाकी वाहन उपलब्ध नाही अशा भक्तांना वनविभागाच्या वाहनांनी खिल्लारी गेटवरून आंबा करीत दर्शनाकरिता निशुल्क सोडण्यात येणार आहे.
तसेच अंबाखोरीत भाविकांना दर्शन घेण्याकरिता येता यावे म्हणून महाराष्ट्र शासनाची एक दिवसाकरिता बस सुविधा पवनी ते अंबाखोरी उपलब्ध राहणार आहे.हे देवस्थान पेंच व्याघ्र प्रकल्पात येत असल्याने वर्षातून फक्त एक दिवसा करीताच बोले बाबाचे दर्शन घेता येते.त्यामुळे भाविकांना दर्शनाची उत्सुकता असते.
पेंच व्याघ्र प्रकल्प अंतर्गत तोतलाडोह जवळील अंबाखोरी देवस्थानात १९६८ पासून नित्यनियमाने दरवर्षी महाशिवरात्री निमित्य यात्रा भरते.अंबाखोरीत पुरातन शिव देवस्थान असून या परिसरातील सर्व भाविक भक्त तोतलाडोह पेंच प्रकल्प व पेंच व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात येण्या आधीपासून हे देवस्थान परिसरातील नागरिकांचे श्रद्धा स्थान आहे.या ठिकाणी नेहमी भक्त शिव दर्शनाकरिता येत असत.
हे ठिकाण निसर्ग सौंदर्याने नटलेला असून शिवलिंग पर्वताचे गुफेत आहे.पर्वतावरून निश्चल गंगेची सतत पडणारी धार वाहत असते.बाजूलाच पेंच नदीचे झुळझुळ वाहणारे पाणी पाहून तेथे येणाऱ्या भक्तांना मनःशांती प्राप्त होऊन तृप्ततेने समाधान मिळते.
मात्र पेंच व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आल्यावर या ठिकाणी सर्व सामान्य नागरिकांना जाण्यास बंदी घालण्यात आली. वनविभागाच्या परवानगी शिवाय विना शुल्क कोणालाही जाता येत नाही.पण एक दिवसाकरिता रामविलास शर्मा यांनी वनविभाकडून रितसर परवानगी घेतली आहे.त्यामुळे परिसरातील भाविकांना निशुल्क प्रवेश देण्यात येणार आहे.
तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चा भंग होणार नाही व वन्यप्राण्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असे निर्देश वनविभागा द्वारे देण्यात आले.तसेच अभयारण्यात कोणत्याही प्रकारचे वाद्य वाजवण्यास ,कचरा करण्यास मनाई करण्यात आली आहे.या अटी व शर्तीच्या अधीन राहून शिवभक्तांना भोले बाबाच्या दर्शन घेता येईल.
वनविभागाने एक दिवसाची परवानगी दिली आहे.यामुळे शिवभक्तांनी आनंद व्यक्त केला आहे.भाविकांनी वन विभागाने दिलेल्या निर्देशाचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन श्री अंबाखोरी सेवा समिती चँरिटेबल ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले आहे.