Saturday, December 21, 2024
Homeगुन्हेगारीदेवलापार पोलीसांनी दिले चार गोवंशांना दिले जिवदान...

देवलापार पोलीसांनी दिले चार गोवंशांना दिले जिवदान…

अवैध गोंवश वाहतूक करणारी वरना कार पकडली

देवलापार – राजू कापसे

जबलपूर कडून नागपूरकडे गोवंशाची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या वरणा कारला पकडून चार गोवंशांना देवलापार पोलिसांनी जीवदान दिले मात्र पोलिसांच्या भीतीने काही अंतरापूर्वीच कार थांबवुन आरोपी चालक पळून जाण्यात यशस्वी झाला.

गोपनीय माहितीच्या आधारे जबलपुर कडुन नागपुर कडे देवलापार मार्गे साडेनऊ ते दहा वाजता दरम्यान एक सिल्वर रंगाची वरणा कार अवैध रित्या जनावर वाहतूक करून खवासा दिशेने देवलापार कडे येत असल्याची माहिती देवलापार पोलिसांना मिळाली होती. दरम्यान देवलापार पोलीसांनी मोरफाटा समोर नाकाबंदी लावली असता सदर वाहन नाकाबंदी करून थाबंवले असता ३०० मिटर अगोदर थांबवुन आरोपी पळून गेला.

सदर वाहनाची खबरी ने सांगितलेल्या माहीती प्रमाणे वरना कार क्र.MH-02-BG-2231 वरणा वाहनाची पंचासमक्ष तपासणी केली असता कार मध्ये आखुड दोरखंडाने गोवंशांचे तोंड, मान, पाय अत्यंत क्रुरतेने व निर्दयतेने बांधलेले एकुण ४ गोवंश जनावरे किंमत ४५०००/- रू व वाहन वरना कार क्र.MH-02-BG-2231 किंमत ३५०००० /- रू असा एकुण ३९५०००/- रू चा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला.

जनावरांची योग्यरित्या चारा-पाणी व देखभाल होणे करीता सदरची जनावरे गो-शाळा देवलापार येथे दाखल करण्यात आले. फरार चालका विरुद्ध अवैद्यरित्या जनावरांची वाहतुक केल्या प्रकरणी अप क्र. २७६/२०२४ कलम २८१,३२५ भा.न्या सा सहकलम ११(१) (ड) प्राण्याचा छळ प्रतिबंध अधिनियम सहकलम ५ (अ), ९ महा. प्राणि संरक्षण अधिनियम, सहकलम ११९ मपोका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही सपोनि नारायण तुरकुंडे पोस्टे देवलापार, पोहवा रविंद्र मेश्राम , पोहवा गजानन कविराज , पोलीस शिपाई सचिन येलकर, मनिश चौकसे, केशव फड यांनी केली असून सदर गुन्हयाचा पूढिल तपास पोहवा रविंद्र मेश्राम हे  करीत आहेत.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: