रामटेक – राजु कापसे
रामटेक :- लोकशाहीची हत्या करणाऱ्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ची अंत यात्रा काढून मौदा घाटा वर तिसरा दिवस करून निषेध करण्यात आला… लोकशाहीचा खून व सत्तेचा गैरवापर करत लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाचा, हुकूमशाही सरकारची अंत्ययात्रा काढून व कन्हान नदी परिसर मौदा येथे तिसरा दिवसाचा कार्यक्रम करून नागपूर जिल्ह्यातील शिवसैनिकाकडून मौदा येथे जाहीर निषेध करण्यात आला.
शिवसेनेच्या जीवावर मोठे झालेले,गडगंज संपत्ती जमवणारे, त्याच शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून गद्दारी करणारे हे गद्दार. महाराष्ट्राचे खच्चीकरण करणाऱ्या बीजेपीचे तळवे चाटत आहेत. या निकालानंतर हेच गद्दार जल्लोष साजरा करत आहेत. पण गद्दारानो हा तुमचा आनंद जास्त दिवस टिकणार नाही. तुमच्या पापाचा घडा भरत आलाय..
सत्तेच्या जोरावर पक्षाचे चिन्ह विकत घेवू शकता,पक्ष विकत घेवू शकता पण बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकांना विकत घेवू शकत नाही. ती तुमची औकात नाही. सत्तेचा माज करणाऱ्या भाजप सरकारला जनता माफ करणार नाही. व सरकारची तिरडी येणाऱ्या निवडणुकात जनता उचलल्याशिवाय राहणार नाही.
सत्तेचा माज उतरेल व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विजय होईल अस्या भावना शिवसेना जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी व्यक्त केला. ही सरकारच्या व नार्वेकरांच्या भावना मेलेल्या आहेत म्हणून त्यांची अंतयात्रा काढत तिसऱ्या दिवसाचा कार्यक्रम मौदा घाटावर पार पडला. मृत सरकारच्या शांतीसाठी आज शिवसेना जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले यांच्या सह शिवसैनिकांनी केशार्पण केले.
यावेळी माजी खासदार प्रकाश जाधव, विदर्भ संपर्क प्रमुख सुरेश साखरे,जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले, रामटेक विधानसभा प्रमुख विशाल बरबटे, रामटेक लोकसभा सहसपर्क प्रमुख उत्तम कापसे, जिल्हा संघटक राधेश्याम हटवार, तालुकाप्रमुख कैलास खंडार, मौदा संपर्कप्रमुख नरेश भोंदे, कामगारसेना जिल्हाप्रमुख समीर मेश्राम, गणेश मस्के, उपजिल्हा प्रमुख दीपक मुळे, रमेश तांदूळकर सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.