माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी आपण कोणाच्या शेजारी बसलो आहोत, हे उद्धव ठाकरे विसरले आहेत, यावर उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावत म्हणाले, आम्ही जम्मू-काश्मीरमध्ये गेलो नव्हतो, असं सांगतानाच आमच्यावर बोलताना जपून. आम्ही काही नवाज शरीफ यांचा केक कापण्यासाठी गेलो नव्हतो, असा हल्लाच संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना लगावला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पाटणा येथे विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीचा उद्देश कुटुंबाला वाचवणे हा आहे. घराणेशाही पक्ष आपली कुटुंबे वाचवण्यासाठी युती करत आहेत. 2019 मध्येही असेच प्रयत्न करण्यात आले होते, परंतु काही उपयोग झाला नाही. ते पुढे म्हणाले की, जे उद्धव ठाकरे आम्हाला मुफ्तीबद्दल टोमणे मारायचे ते आज त्यांच्यासोबत बसले आहेत, हे पाहून आश्चर्य वाटते.
देवेंद्र फडणवीसांच्या या टीकेला खासदार संजय राऊत यांनी उत्तर देत म्हणाले, उद्धव ठाकरे मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी बसले म्हणून काल म्हणे देवेंद्र फडणवीसांनी सडकून टीका केली. त्यांना इतकंच सांगेन की, काश्मीर हा हिंदूस्थानचा अविभाज्य भाग आहे. तुम्ही स्वतः मेहबुबा मुफ्तींबरोबर अडीच वर्ष सरकार चालवलं आहे. त्या सरकारमध्ये तुम्ही होता. मुफ्ती यांच्या शपथविधीला स्वतः पंतप्रधान उपस्थित होते. त्यामुळे अशी सडकून टीका करताना जरा जपून करा.
खासदार संजय राऊत म्हणाले, आम्ही नवाज शरीफांचा केक कापायला कधी गेलो नाही, किंवा त्यांच्या सरकारमध्ये सामील झालो नाही. भविष्यात त्यावर आम्ही अधिक चर्चा करू. कदाचित उद्धव ठाकरे आज यावर सविस्तर बोलतील. उगाच तोंडाच्या वाफा दवडू नको. तुचमंच भूत आहे ते आणि तुमचंच पाप आहे.
काल पाटण्यात भाजपच्या विरोधात मोर्चा काढण्यासाठी विरोधी पक्षांची बैठक झाली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधकांना एकत्र करण्यासाठी ही बैठक बोलावली होती. यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि विरोधी पक्षांचे सर्व बडे नेते सहभागी झाले होते.