सध्या विधिमंडळाच पावसाळी अधिअवेशन सुरु असून या अधिवेशनात मराठा नेते, शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती निधनावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरले असता, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना प्रत्युत्तर दिलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना प्रत्युत्तर दिलं आहे. विनायक मेटेंच्या ड्रायवरने ओव्हटेक करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच हा अपघात झाला असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. याबाबत फडणवीसांनी विधानसभेत निवेदनही दिले आहे.
मुंबई गोवा महामार्गावर शेवटच्या लेनमधून चालणारा ट्रॉलर मधल्या लेनमधून चालत होता. त्यामुळे विनायक मेटेंच्या ड्रायवरला ओव्हरटेक करायला जागा मिळत नव्हती. काही काळ ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्यानंतर ड्रायव्हर तिसऱ्या लेनमध्ये गेला. तिसऱ्या लेनमधूनही ओव्हरटेक करण्याच्या त्याने प्रयत्न केला मात्र, पुढे एक वाहन होते. या दोन वाहनांच्यामध्ये जी जागा होती त्या जागेतून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न मेटेंच्या ड्रायव्हरने केला. आणि त्या नादात विनायक मेटे आणि त्यांचे अंगरक्षक गाडीत ज्या बाजूला बसले होते त्या बाजूला जोरात धडक बसली असल्याचे फडणवीस म्हणाले.