“देवेंद्र फडणवीस” याचं “देवा भाऊ” हे गान सध्या राज्यात गाजतेय. येन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘देवा भाऊ’ टॅगलाईन वापरत भाजपने राज्यात जोरदार प्रचार मोहीम सुरू केली आहे. आधी लाडकी बहिण योजनेच्या प्रचारासाठी भाजपनं “देवा भाऊ” या टॅगलाईन चा वापर केला होता. आता देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांनी झालेले विकास कामं मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्यात “देवा भाऊ” या आशयाने जोरदार प्रचार केला जात आहे. देवेंद्र फडणवीस संदर्भात नागपुरात वापरत असलेला शब्द देवा भाऊ संपूर्ण राज्यात आता ओळख होत असल्याचे दिसत आहे. या प्रेमाच्या शब्दाचा वापर भाजप विचारपूर्वक करत आहे का ? तसेच एक ब्राह्मण नेता या अनुषंगाने विरोधक देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत असताना, विरोधकांचा तो हल्ला बोथट करण्यासाठी हे भाजपच्या रणनीतीचा एक भाग आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्याने उपस्थित झाले आहे.
या शब्दाची सुरुवात नागपुरातून होर्डिंग ने झाली मात्र आता या शब्दाची टॅगलाईन देवून गाणे बनविले आहे. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांची एका नामांकित प्रसार माध्यमाने जाहिरात घेतली होती. त्यावेळी त्यांना ‘देवा भाऊ’ असे लाडकी बहीण योजनेमुळे म्हणायला सुरुवात केली का? असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी देवा भाऊ या नावाने मला आधीपासूनच काही जण बोलवतात. परंतु लाडकी बहीण योजनेनंतर ते जास्त प्रसिद्ध झाले. ‘देवा देवा, देवा भाऊ’ असे या गाण्याचे बोल आहेत. तर त्या गाण्यात रामभक्त आणि शिवभक्त म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केला गेला आहे. तसेच या गाण्यामार्फत देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या जनतेसाठी काय काय योजना राबविल्या आहेत या संदर्भातील माहिती या गाण्याच्या माध्यमातून दाखविली आहे. देवेंद्र फडणवीस 1999 पासून नागपुरात सलग 25 वर्ष आमदार आहेत. भाजपसाठी आणि राज्यात त्यांनी वेगवेगळे पद भूषवले आहे. त्यामुळे ते नागपूरकरांसाठी चांगलेच परिचयाचे आहेत. नागपुरात मोठ्या संख्येने सामान्य लोकं, त्यांना देवा भाऊ या नावानेच ओळखतात.
गेले काही महिने खास करून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगेंचे आंदोलन सुरू झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री असतानाही विरोधकांच्या थेट टार्गेटवर आहेत. जरी फडणवीसांना घेरण्यासाठी विरोधक त्यांच्या ब्राह्मण जातीचा थेट उल्लेख करत नसले, तरी राजकीय दृष्टिकोनातून फडणवीस या आडनावाचा वापर करून अप्रत्यक्षरीत्या तसेच प्रयत्न सुरू आहेत. विरोधकांचा देवेंद्र फडणवीसांवर त्यांच्या जातीवरून होत असलेला हल्ला परतावून लावण्यासाठी ही भाजपला देवेंद्र फडणवीस यांची देवा भाऊ हीच प्रतिमा जास्त फायद्याची वाटत असावी, अशी शक्यता आहे. त्यामुळेच देवा भाऊ या टॅग लाईनसह भाजपने देवेंद्र फडणवीस यांना मतदारांसमोर एका नव्या पॅकेज मध्ये प्रस्तुत करण्याचा प्रयत्न या मोहिमेतून सुरू केला असावा, अशी चर्चा आहे.