वहाळा बु. येथे सचिवाचा प्रताप : सीईओकडे तक्रार
पातूर – निशांत गवई
पातुर पंचायत समिती अंतर्गत वहाळा बु. येथे १ सप्टेंबर २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत सचिवांनी विकास कामे कागदोपत्री दाखवून लाखो रुपयांची देयक हडपल्याचा आरोप ग्राम पंचायत सदस्य संघपाल संसारे, ललिता गजानन चोरे, संध्या सदानंद मोरे, गोपाल गजानन सौंदळे, कुसुम राजेंद्र मोरे, या पाच सदस्यांनी १८ जुलै रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीतून केला आहे.
जि.परिषद शाळेत आरओ फिल्टर मशीन न देता आरओ मशीन खरेदी कागदोपत्री दाखवून देयक काढले, भूमि गटारांचे काम,पाणी व स्वच्छता,यावर लाखोंची देयक काढली, नाली, पेव्हर ब्लॉकचे काम निकृष्ट दर्जाचे करून लाखोंची देयक काढली, व महिला प्रशिक्षणावर ५५ हजार रुपये,असे अनेक विकास कामे कागदोपत्री दाखवून लाखो रुपयांची देयक काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. कागदोपत्री केलेल्या कामाची मोका पाहणी करून सचिवावर कारवाई करून रकमेची वसुली करण्याची मागणी केली आहे.