Sunday, December 22, 2024
Homeराजकीयआमदार फंडामधून प्रभाग क्रमांक १८ मध्ये विकास कामांना शुभारंभ - आमदार सुधीर...

आमदार फंडामधून प्रभाग क्रमांक १८ मध्ये विकास कामांना शुभारंभ – आमदार सुधीर दादा गाडगीळ…

सांगली – ज्योती मोरे

आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या स्थानिक विकास निधी (आमदार फंड) मधून प्रभाग क्रमांक 18 शामराव नगर येथे विनायक नगर गल्ली नंबर 2 येथील रस्त्यास दोन्ही बाजूच्या गटर बांधकाम करणे व कोल्हापूर रोडवरील शिवराज नगर अंतर्गत रस्ते खडीकरण व मुरुमीकरण करणे असे एकूण 40 लाख रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते व नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आला तसेच याभागातील प्रलंबित असलेली कामे ही लवकरच पूर्ण करू असे आश्वासन दिले यावेळी अमर पडळकर, शहाजी भोसले,

रोहित जगदाळे, शैलेश पवार, लियाकत शेख, गणपती साळुंखे, गजानन लकडे, विष्णू पाटील, राजेंद्र चव्हाण, प्रकाश पाटील, जाकीर फनीबंद, प्रताप ऐसादे, मिलिंद पतंगे, जगदीश भोळे, संदेश कुरणे राजू पिल्ले, अशोक बनसोडे, सीमा लकडे, ज्योती पतंगे, कमल पाटील, आरती शिंदे, अंजना माने, सिंधुताई पाटील, सारंग साळुंखे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: