सांगली – ज्योती मोरे
आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रयत्नांमधून जुनी धामणी, इनामधामणी मध्ये रस्ते, गटारी अशा जवळपास तीन कोटींच्या विकासकामे मंजूर झाली आहेत. जुनी धामणीमध्ये २ कोटी ३६ लाख तर इनामधामणी मधील २७ लाख ९१ हजार रुपयांच्या कामांचा यामध्ये समावेश आहे आमदार गाडगीळ यांच्या हस्ते या कामाचे उदघाटन व शुभारंभ करण्यात आले.
नागरिकानी यावेळी आमदार गाडगीळ यांचे आभार मानले. जुनी धामणी ते राष्ट्रीय महामार्ग पर्यंत रस्ता रुंदीकरण करणे व आरसीसी गटर बाधकाम करणे या कामांसाठी २ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. यावेळी सचिन कोळी ग्रामपंचायत सदस्य बाबासो पाटील, विनोद कोडी माजी सरपंच अण्णासो चौगुले,
जगदीश कोळी, हिम्मत कोडी, बाळासो गायकवाड, विठ्ठल कोळी, धीरज पाटील, सुमाष पाटील, गुरूास पाटील गणपती कोळी, नेमिनाथ सौगुले, नितेश सूर्यवंशी, रामचंद्र सूर्यवंशी, अजित पाटील, अमित पाटील, विजय सूर्यवंशी, गणपती साळुंखे, सार्वजनिक बांधकाम विभागाने अधिकारी आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
तसेच इनामधामणी येथील ग्रामविकास २५१५ खाते अंतर्गत गावातील सोयी सुविधा करणेसाठी मंजूर करण्यात आलेले सतीश सवदे घर ते नंदकुमार कानवाडकर कारखाना रस्ता करणे (३ लाख ११ हजार ) प्रजीम ४३ ते घाडगे घर व यासीन शेख घर पर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे (६ लाख १० हजार ) जय जिनेन्द्र मंडळ ते जंबू पाटील घरापर्यंत रस्ता डांबरीकरण गटर करणे (१८ लाख ७० हजार) असे एकूण २७ लाख ९१ हजार या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी सरपंच आश्विनी कोळी, ग्रा.पं.सदस्या अपर्णा कोळी राजमती मगदूम दिया वडेर दिपाली हेलें, सुहास पाटील, विजय पाटील, श्रीकांत कोडी, प्रशांत पाटील, अमोल कोळी, जयराम कोळी, दिगंबर कोळी, प्रमोद माळी, सदाशिव सारवाडे आदी उपस्थित होते.