Monday, December 23, 2024
Homeराज्यउपकार्यकारी अभियंता संतोष खुमकर यांचा सत्कार...

उपकार्यकारी अभियंता संतोष खुमकर यांचा सत्कार…

तांत्रिक कामगार युनियन व विविध संघटनाचा पुढाकार…

पातूर – निशांत गवई

पातूर येथे वीज वितरण कंपनीत सेवा देणारे उपकार्यकारी अभियंता संतोष खुमकर यांचा नुकताच सत्कार पार पडला. तांत्रिक कामगार युनियन ५०५९च्या वतीने आयोजित कार्यक्रमात पत्रकार व विविध संघटनानी पुढाकार घेतला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तांत्रिक कामगार युनियन चे केंद्रीय सरचिटणीस प्रभाकर लहाने हें होते. तरसत्कार्मुर्ती म्हणून उपकार्यकारी अभियंता संतोष खुमकर प्रामुख्याने उपस्थित होते.

तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पत्रकार संघांचे माजी अध्यक्ष मोहन जोशी, उपकार्यकारी अभियंता मानकर साहेब, तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय उपाध्यक्ष गोपाल गाडगे, प्रादेशिक सचिव संजय गाडगे, विभागीय सचिव विनायक मुठाळ, राम गोटे पाटील, वैभव तायडे,संतोष निमकंडे, प्रविण तायडे, राम कुटे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी वीज वितरण कंपनीच्या पातूर विभागात सेवा देणारे उपकार्यकारी अभियंता संतोष खुमकर यांना तांत्रिक कामगार युनियनच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा पत्रकार संघ, धर्मवीर संघटना, महाराष्ट्र माळी युवक संघटना, शिवसेना ( ठाकरे गट ) पातूर, नवयुवक मंडळ, अभ्युदय फाउंडेशन, जय बजरंग फ्रेंड्स क्लब व पत्रकार बांधव यांचेसह विविध सामाजिक संघटनानी सुद्धा संतोष खुमकर यांचा सत्कार केला.

यावेळी जेष्ठ पत्रकार उमेश देशमुख, धर्मवीर संघटनेचे सचिन बारोकार, महाराष्ट्र माळी युवक संघटनेचे चंदु बारतासे, जीवन ढोणे, शिवसेनेचे अनिल निमकंडे, अंबादास देवकर, नवयुवक मंडळाचे विलास देवकर, जय बजरंग फ्रेंड्स क्लबचे अजिंक्य निमकंडे, पत्रकार निखिल इंगळे, किरणकुमार निमकंडे, अभ्युदय फाउंडेशनचे प्रविण निलखन,

पत्रकार साजिद सर, श्रीकृष्ण शेगोकार, राम वाढी आदींनी सत्कार केला. याप्रसंगी चेतन निखाडे, रमेश तायडे, रणजित जाधव, विकास तेलगोटे,, शिवशंकर ढोरे, राजू काकडे,शंकर पारस्कर, पूजेश गोळे, राजू भुमरे, आशिष गुलालकरी, राजू कुटे, संतोष घुगे, राजू सौंदळे, आशिष गवई, निलेश बोचरे, सपना सुरवाडे, पल्लवी गाडगे, कोमल इंगळे, गोपाल दुतोंडे, गणेश बंचर, महेंद्र खोकले आदिसह पंकज वालोकर आदी उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: