Sunday, December 22, 2024
Homeराज्यउपायुक्‍त माधुरी मडावी यांनी केली कंवर नगर मधील चवरे मार्केट व राजकमल...

उपायुक्‍त माधुरी मडावी यांनी केली कंवर नगर मधील चवरे मार्केट व राजकमल चौकातील नाल्‍याची पाहणी…

चवरे मार्केट मध्‍ये प्‍लास्‍टीक आढळून आल्‍याने सदर आस्‍थापनेला ठोठावला दंड

अमरावती – दुर्वास रोकडे 

महानगरपालिका उपायुक्‍त माधुरी मडावी यांनी आज दिनांक २४ जुलै,२०२४ रोजी कंवर नगर मधील चवरे मार्केट व राजकमल चौकातील नाल्‍याची पाहणी केली. या पाहणी दरम्‍यान सहाय्यक आयुक्‍त भुषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, उपअभियंता प्रमोद इंगोले, अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्‍हे, जेष्‍ठ स्‍वास्‍थ निरीक्षक विजय बुरे, स्‍वास्‍थ निरीक्षक विकी जेधे, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

उपायुक्‍त माधुरी मडावी यांनी कंवर नगर मधील चवरे मार्केट ची पाहणी केली असून सदर आस्‍थापनाची तपासणी केली. तपासणी दरम्‍यान २ आस्‍थापनामध्‍ये प्‍लास्‍टीक आढळून आल्‍याने सदर आस्‍थापना श्री मंगलानी यांना ५००० रुपये, अरोरा वाईन शॉप यांना ५००० रुपये दंड करण्‍यात आला. १ दुकानदाराला प्‍लास्‍टीक बाबत दंड आकारण्‍यात आले असून त्‍यांनी दंड न भरल्‍यामुळे सदर दुकान सिल करण्‍यात आले. शहरातील आस्‍थापनांनी प्‍लास्‍टीक चा वापर करु नये. सदर आस्‍थापनामध्‍ये प्‍लास्‍टीक आढळून आल्‍यास सदर आस्‍थापनेवर कार्यवाही करुन सिल केल्‍या जाईल अशी तंबी उपायुक्‍त माधुरी मडावी यांनी दिले.

प्लास्टिकपासून विविध वस्तू तयार केल्या जातात. प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणाला हानी होत असल्याचे समोर आल्यानंतर राज्य शासनाने प्लास्टिक पिशव्यांसह इतर वस्तू व थर्माकॉलच्या वापरावर बंदी घातली आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून यासंदर्भात वेळोवेळी आवाहन केले जात असले तरी काही व्यावसायिक, दुकानदार प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत असल्याचे समोर आले आहे. अशा व्यावसायिकांच्या दुकानांची तसेच प्रतिष्ठाणांची तपासणी करून संबंधितांवर कारवाई केल्या जात आहे.

आज दिनांक २४ जुलै,२०२४ रोजी मनपा उपायुक्त माधुरी मडावी यांनी प्रभाग क्रमांक २२ नवी वस्ती बडनेरा येथील मनपा सफाई कामगार यांच्या हजेरीची तपासणी केली. तसेच समता चौक बडनेरा येथे साखरे टी पॉइंट पानठेला व चहा टपरी येथे कचरा पडलेला आढळून आल्‍याने ५००० रुपये दंड करण्याबाबत निर्देश उपायुक्‍त माधुरी मडावी यांनी दिले. यावेळी कचरा आढळून आल्‍याबाबत सदर आस्‍थापनेला ५००० रुपये दंड करण्यात आला.

उपायुक्‍त माधुरी मडावी यांनी राजकमल चौकातील नाल्‍याची पाहणी केली. पाहणी दरम्‍यान चौकातील नाली ब्‍लॉक झाले असून सदर नालीची जेसीपीद्वारे कार्यवाही करण्‍यात आली. यावेळी उपायुक्‍त माधुरी मडावी यांच्‍या निर्देशानुसार राजकमल चौकातील नाली जेसीपीद्वारे तोडण्‍यात आली. सदर नाली मोकळे करुन नाली वाहते करण्‍यात आले.

उपायुक्‍त माधुरी मडावी यांनी कंवर नगर मधील चवरे मार्केट परिसरातील नाल्‍याची पाहणी केली. सदर परिसर साफ करण्‍याचे निर्देश उपायुक्‍त माधुरी मडावी यांनी संबंधीतांना दिले.
नाला परिसराची पाहणी करतांना नाल्‍यात जो साईडला गाळ काढून ठेवला जातो तो उचलण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यासाठी संबंधीत उपअभियंते यांना नियोजन करण्‍याचे निर्देश यावेळी त्‍यांनी दिले.

अतिक्रमण विभागाने नाले साफ सफाई करत असतांना पाण्‍याच्‍या प्रवाहात गाळ येणार नाही याची दक्षता घेणे आवश्‍यक आहे. नागरिकांनीही नाल्‍यात कचरा टाकू नये महानगरपालिका नाले साफ करते पण नागरिक त्‍यामध्‍ये गाद्या, घरातील टाकाऊ वस्‍तू, पूजेचे साहित्‍य, या सारखे अनेक प्रकारचे सामान टाकतात त्‍यामुळे नाल्‍याच्‍या प्रवाहात अडथळे निर्माण होवून अनेक वस्‍त्‍या पाणी जाण्‍याच्‍या दुर्घटना घडतात. नाल्‍याच्‍या परिसरात राहणा-या नागरिकांनीही सतर्क राहून कोणालाही नाल्‍यात कचरा फेकू देवू नये.

संपुर्ण परिसरात स्वच्छता कायम राहावी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक बाबींची पूर्तता करावी. नागरिकांना कोणतीही असुविधा होऊ नये, याबाबत विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका उपायुक्‍त माधुरी मडावी यांनी संबंधित यंत्रणेला केले. पाहणी दरम्‍यान राजकमल चौक परिसरात अनधिकृत पानठेले आढळून आल्‍याने अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही करण्‍यात आली उपायुक्‍त माधुरी मडावी यांनी आज सायंस्‍कोर मैदान परिसरात हॉकर्सवर कार्यवाही करुन सदर हॉकर्स ला सक्‍त सुचना दिल्‍या.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: