Monday, December 23, 2024
Homeराजकीयशेकडो विकासकामांचा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा...

शेकडो विकासकामांचा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा…

  • बैठकीला रामटेक पारशिवणीतील शेकडो अधिकारी – पदाधिकाऱ्यांची हजेरी
  • पोलीसांचा चोख बंदोबस्त

रामटेक – राजु कापसे

आज दि.११ जुन ला दुपारी १२.३० दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री तथा नागपुर जिल्याचे पालकमंत्री असलेले देवेंद्र फडणविस यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील गंगा भवनम सभागृहात आढावा बैठक पार पडली.

यात शेकडो विकासकामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष जयस्वाल, माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांचेसह पदाधिकारी व रामटेक, पारशिवनीतील विविध विभागातील शेकडो अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.

आज देवेंद्र देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नागपूर जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. बैठक दुपारी १२.३० ते २ दरम्यान पार पडली. यात विविध विकासकामांवर आढावा घेण्यात आला. त्यात उपविभाग रामटेक इतर बाबत धोरण आणि अंमलबजावणी, अमृत सरोवर अभियान २०२३ २०२४ तालुका रामटेक ,

अमृत सरोवर अभियान २०२३ २०२४ तालुका पारशिवनी , जलयुक्त शिवार योजना २.० सन २०२४, जलयुक्त शिवार तलाव खोलीकरण गहु तलाव रामटेक, नाला खोलीकरण मौजा वराडा , पांधण रस्ते , मातोश्री ग्राम समृद्धी शेत पांदण रस्ते योजना , पीएम किसान प्रगती आढावा , भारत संचार निगम लिमिटेड बीएसएनएल यांच्या जागा उपलब्ध करून देणे बाबत, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ,

संजय गांधी निराधार अनुदान योजना , संजय गांधी निराधार अनुदान योजना , वैयक्तिक वन हक्क कायदा २००६ अंमलबजावणी , वन हक्क कायदा २००६ अमलबजावणी , गाव येथे समशानभूमी , टँकर व विहीर अधिग्रहण माहिती , सर्वांसाठी घरे , सेतु केंद्र , कोलवाल नियुक्ती , पोलीस पाटील नियुक्ती , पुरवठा विभाग रामटेक , शासन आपल्या दारी , ई ऑफिस प्रणाली ,

ई पंचनामा , ई चावडी , ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जल जीवन मिशन कार्यक्रम , रोजगार हमी योजना , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा , स्वच्छ भारत मिशन अभियान , आरोग्य विभाग , महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना , सार्वजनिक शौचालय बांधकाम मौजा भिलवाडा ,

प्रधानमंत्री आवास योजना (नागरी), प्रधानमंत्री आवास योजना नागरी पट्टे वाटप , खरीप हंगाम सरासरी पेरणी क्षेत्र सन २०२२ प्रत्यक्ष पेरणी आणि सन २०२३ करिता प्रस्तावित क्षेत्र हेक्टर , खरीप हंगाम २०२३ बियाणे नियोजन सन २०२२ ते २३ मधील रा खताचा वापर व खरीप 2023 ते २४ करिता आवंटन इत्यादींचा आढावा घेण्यात आला. बैठकीला उपजिल्हाधिकारी यांचेसह विविध विभागाचे अधिकारी – कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: