Saturday, December 28, 2024
Homeराज्यउपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतले पुण्यातील मानाच्या गणपतींचे दर्शन...

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतले पुण्यातील मानाच्या गणपतींचे दर्शन…

राज्यातील जनतेच्या आयुष्यात सुखसमृद्धी आणि समाधान लाभू दे, शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलू दे गणरायाला घातले साकडे…

मुंबई – धीरज घोलप

दि.२१: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काल बुधवार दिनांक २० सप्टेंबर रोजी दुपारी ४ नंतरन पुण्यातील मानाच्या गणपतींचे दर्शन घेतले.

यामध्ये त्यांनी सर्वप्रथम पुण्याचे ग्राम दैवत असलेल्या कसबा गणपतीचे दर्शन घेत आरती केली. त्यानंतर त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. तेथेही त्यांच्या हस्ते गणरायची आरती करण्यात आली. त्यानंतर महात्मा फुले मंडई येथील अखिल मंडई गणेशोत्सव मंडळ, लक्ष्मी मार्ग येथील गुरुजी तालीम मंडळ,

तांबडी जोगेश्वरी मंडळ, बाल मित्र मंडळ, तुळशीबाग येथील तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि केसरीवाडा येथील लोकमान्य टिळक वाडा गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले. यादरम्यान त्यांचा मंडळांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

गणेशोत्सवादरम्यान शासनाने निर्बंध दूर केल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. सर्व गणेशमंडळांनी आकर्षक देखावे साकारले आहेत. हे देखावे पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने बाहेर पडत असून भाविकांच्या उत्साहाला उधाण आले असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यावेळी म्हणाल्या. तसेच राज्यातील जनतेच्या आयुष्यात सुखसमृद्धी आणि समाधान लाभू दे, शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलू दे असे साकडे त्यांनी श्री गणरायाला घातले.

गणेश मंडळांना भेटी देऊन दर्शन घेत असताना नागरिकही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांना आवर्जून भेटत होते त्यांच्या सोबत फोटो, सेल्फी काढत होते. डॉ. गोऱ्हे यांनी देखील सर्वांची भेट घेत विचारपूस केली.

याप्रसंगी शिवसेना पुणे शहराध्यक्ष प्रमोद (नाना)भानगिरे, युवासेना महाराष्ट्र राज्य सचिव श्री. किरण साळी, शिवसेना कसबा विभाग प्रमुख श्री. निलेश धुमाळ, युवासेना शहर प्रमुख श्री. निलेश गिरमे, शिवसेना महिला शहर प्रमुख श्रीमती. पूजा रावेतकर, श्रीमती. लीनाताई पानसरे, राजू विटकर, युवराज शिंगाडे यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: