मुंबई – धीरज घोलप
राष्ट्रीय, जनतेच्या संपत्तीचे, मोकळ्या जागेचे रक्षण करणे पालिका तसेच पोलिसांची जबाबदारी आहे. मग ते रेल्वे सेवा का असेनात, कारण वाहतुकीला अडथळ्याप्रद ठरणाऱ्या वैद्य फेरीवाल्यांच्या हातगाड्या वाहतूक पोलीस माल सामान जप्ती सह जबर दंड आकरू शकतात. तसेच पोलीस ही सार्वजनिक उपद्रव्यबाबत पथ विक्रेत्यावर कायदेशीर निष्कासन कारवाई करू शकतात, तक्रारीची गरज नसतानाही.
मात्र पार्क साईट येथील गोदरेज गेट जवळील फूटपाथ वर जेवढे फेरीवाले बसतात त्या सर्व फेरीवाल्यांवर पार्क साईट पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक मेर यांनी फेरीवाल्यावर पॉलिसी दंडात्मक कारवाई केल्यानंतर गोदरेज गेट जवळील सर्वच फेरीवाले हद्दपार होताना दिसत आहे .