Sunday, November 17, 2024
Homeराज्यबौद्ध, मातंग समाजातील महिलांना शिवीगाळ करणाऱ्या गावगुंड आरोपीस हद्दपार करा - पंचशील...

बौद्ध, मातंग समाजातील महिलांना शिवीगाळ करणाऱ्या गावगुंड आरोपीस हद्दपार करा – पंचशील कांबळे…

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड कंधार तालुक्यातील वहाद येथील कुख्यात गाव गुंड असणाऱ्या दोन आरोपींवर विविध गुन्हे माळाकोळी पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल असुन आरोपी अजुनही मोकाट फिरत आहे व तो बौद्ध आणि मातंग वस्तीत जाऊन महिलांना शिवीगाळ करत आहे अश्या गाव गुंडांना हद्दपार करा असे निवेदन पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी कार्यालय यांना लोहा येथील नगरसेवक पंचशील कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिले आहे.

निवेदनात असे नमुद केले आहे की,कंधार तालुक्यातील कुरुळा पासुन काही अंतरावर असलेल्या वहाद या गावी कुख्यात गावगुंड असलेले रावसाहेब व्यंकटी मुकनर व पिराजी रावसाहेब मुकनर या दोन आरोपी विरोधात अनुसुचित जाती अनुसचित जमाती आत्याचार प्र (1989) नुसार माळाकोळी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा क्र.122/2018,179/2019,133/2022 गुन्हे दाखल असुन महिला विरोधी विविध गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत सदर आरोपी हा बौद्ध,मातंग समाजातील विविध महिला व गावातील लोकांना जातीय द्वेष भावनेतुन शिवीगाळ,मारहाण करीत असुन जिवे मारण्याच्या धमकी देत आहे.सदर आरोपी हे अनुसुचित जाती अनुसचित जमाती (आत्याचार प्र )अधिनियम (1989) नुसार पुन्हा पुन्हा गुन्हा करीत असुन अनुसुचित जातीच्या लोकांच्या जमिनी बळकिवीत आहे.

सदर आरोपी द्वारे गावातील इतर लोक सुद्धा त्रस्त आहे आरोपी हा धनाढ्य व गुंड प्रवृत्तीच्या आहे गावातील इतर समाजाचे लोक सुद्धा दहशधीखाली वावरत आहेत करिता या दोन गाव गुंडांना हद्दपार करा असे निवेदन नांदेड पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना नगरसेवक पंचशील कांबळे,

ॲड.संघरत्न गायकवाड म.फुले समता परिषद जिल्हाध्यक्ष नांदेड,ॲड भीमरत्न कांबळे विधी सल्लागार म.फुले समता परिषद नांदेड,मयुर कांबळे संपादक महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह,ज्योती सोपान गायकवाड,जनार्दन शिवाजी जाधव,गौतम बळीराम गायकवाड,वाल्मीक उद्धव जाधव,साहेबराव जळबा जाधव,संजीवनी माधव गायकवाड आदींनी दिले आहे.

या निवेदनावर ज्ञानेश्वर मुकनर,आणाराव मुकनर,माधव मुकनर,विक्रम मुकनर,महानंदा मुकनर,उषाबाई मुकनर,अनुसया मुकनर,चित्रकला मुकनर,शिवबाई मुकनर व आदी गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.सदरील निवेदनाच्या प्रती कंधार उपविभागीय अधिकारी देवयानी यादव,पोलीस उपविभागीय अधिकारी मारोती थोरात,तहसीलदार राम बोरगावकर यांना देण्यात आल्या आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: