सांगली – ज्योती मोरे.
फेडरेशन ऑफ मेडिकल अँड रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन ऑफ इंडियाच्या अवाहना नुसार देशभरातील दोन लाखाच्या वर औषध क्षेत्रात काम करणारे विक्री संवर्धन कर्मचार्यांनी आज देशभरात संप पुकारलाय.त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आलीयत.
चार कामगार विरोधी श्रमसंहिता रद्द करा विक्री संवर्धन कर्मचारी कायदा 1976 चे पणरूज्जीवन करा.,विक्री संवर्धन कर्मचाऱ्यांसाठी कामकाजाचे संविधानिक नियम तयार करा .,औषधांसह औषधी उपकरणांवरील जीएसटी रद्द करा, औषधांच्या किमती कमी करा, डाटा गोपनीयतेचे संरक्षण करा,जीपीएस द्वारे ट्रेकिंग आणि पाळत ठेवून वैद्यकीय प्रतिनिधींच्या खाजगी आयुष्यामध्ये घुसखोरी करू नका.
यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन सांगलीच्या वतीने ही निदर्शने करण्यात आली. यावेळी विभागीय सचिव किशोर केदारी, युनिट सेक्रेटरी संजय गलगले, हेमचंद्र पाटील,बाळासाहेब पाटील,अतुल वीर,शिवराज जामदार,भालचंद्र देशपांडे, प्रसाद पाटील, अतुल येमाजे,सिमंदर मजलेकर, इरफान मुजावर आदींचा इतर अनेक प्रतिनिधी उपस्थित होते.