नांदेड – महेंद्र गायकवाड
वनविभागा अंतर्गत वर्ष 2018 पासून देगलूर, भोकर, हदगाव, वनपरिक्षेत्रात शासनाकडून उपलब्ध झालेल्या निधीची व कामाची चौकशी करून भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी राजेश कदम यांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.
वन विभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी विजय कटके, निखिल हिवरे, एस एस रुद्रावर, प्रतीक मोडवान, यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा कायदा 1979 व वनसंरक्षण व संवर्धन 1981 कामाच्या सुधारित मापदंड कायदा -2014 नुसार योग्य कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन राजेश कदम यांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे.
नांदेड उपवनसंरक्षक कार्यालय अंतर्गत वर्ष 2017 ते 2023 या काळामध्ये देगलूर, हदगाव व भोकर वनपरिक्षेत्रामध्ये जिल्हा नियोजन समिती तसेच राज्य योजनेतून अनेक कामांसाठी निधी देण्यात आला होता. परंतू वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी या निधीचा योग्य वापर केला नसून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शासनाची दिशाभूल करून आर्थिक गैरव्यवहार केले आहेत.
याची चौकशी करून संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी विजय कटके, निखिल हिवरे, ए.एस. रुद्रावर, प्रतीक मोडवान यांच्यावर शासकीय नियमाप्रमाणे चौकशी समिती नेमून त्यांच्यावर योग्य ती दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी निवेदनात केली आहे.