सांगली – ज्योती मोरे
यावर्षीच्या पावसाळयामध्ये अतिशय कमी पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे निर्माण झालेली पाणी टंचाई यामुळे समस्त सांगलीकरांसह कृष्णाकाठावरील अनेक गावांच्या घशाला कोरड पडण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. कारण कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडताना दिसून येत आहे. सर्व उपसासिंचन योजना, पाणी पुरवठा योजना बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
सांगली शहरास दोन ते तीन दिवस पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक राहिला असून दोन दिवसानंतर सांगलीसह आसपासच्या गावांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पाटबंधारे विभागाने कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी करुनही शिवाय पालकमंत्री, मीस्वतः तसेच इतरही सर्व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करुन ही मागील दहा दिवसांत काहीही हालचाल दिसून आली नाही.
यापाणी टंचाई मुळे नदीकाठावरील विविध योजना ठप्प झाल्या असून शेतकऱ्यांसह नागरिक चिंतीत आहेत. शेतीच्या पाण्याची मागणी वाढत असून ही पाणी देता येईनासे झाल्याने पीके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत.
काही दिवसापूर्वी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ही पाणी सोडण्याबाबत आश्वासन देण्यात आले होते, परंतु यावर कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही. यामध्येच कोयना धरणव्यवस्थापणाकडून जलसंपदा विभागाकडे पाणी वापरवाटपाचा अहवाल सादर करण्यात आला आहे, त्यानुसार सुमारे १० % पर्यंत कपातीची सूचना करण्यात आली आहे.
त्यामुळे नागरिक शेती आणि पशुधन वाचविण्यासाठी कृष्णा नदीमध्ये वेळोवेळी पाणी सोडणे गरजेचे आहे. यासंदर्भात संबंधीतांना तत्काळ सूचित करणेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केली आहे.