प्रशांत बाजीराव मसाऱ, सतीश भसारकर यांचा नेतृत्वात सामाजिक कार्यकर्त्यांचे नप मुख्याधिकार्यांना निवेदन…
रामटेक – राजु कापसे
कन्हान येथील महसुल विभागाचे (आर .आय, रेव्हेन्यू इन्स्पेक्टर,तलाठी) कार्यालय जुन्या नगर परिषद कार्यालय इमारत मध्ये कायमस्वरुपी स्थानांतरित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी नगर परिषद मुख्याधिकारी रविंद्र राऊत यांची भेट घेऊन या ज्वलंत विषयावर सकारात्मक चर्चा करुन आणि या संदर्भात लेखी निवेदन पत्र देऊन मागणी करण्यात आली.
पिपरी नगर परिषद अंतर्गत मागील कित्येक वर्षापासुन महसूल विभागाचे आर.आय (रेव्हेन्यू इन्स्पेक्टर) व तलाठी विभाग कार्यालय हे भाडेने व लहान खोलीत किरायाचा जागेत सुरु आहे.
या दोन्ही कार्यालयात विद्यार्थी शैक्षणिक कामा करिता, जेष्ठ नागरिक, निराधार, श्रावणबाळ योजनासाठी, महिला पुरुष व इतर दैनंदिन कामा करिता शैकडो नागरिकांना या कार्यालयाचा पत्ता माहिती नसल्याने इकडे तिकडे भटकावे लागते. कधी पटवारी जागे वर राहत नाही किंवा कोतवाल भेटत नाही.
या कारणास्त त्यांचे शासकीय, निमशासकीय, शैक्षणिक, इतर कामाकरिता शासकीय योजनेसाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणात शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
कन्हान – पिपरी नगर परिषद नवीन इमारती मध्ये काही प्रमाणात सर्व विभाग व इतर काम सुरू झाले आहेत . काही दिवसा नंतर जुनी नगर परिषद कार्यालय इमारत धुळीने,अस्वच्छता व खनंडर होऊन नशा,दारु , धूम्रपान आणि असमाजिक तत्वांचा स्थायी ठिया होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे जुन्या नगर परिषद इमारती मध्ये नागरिकांच्या सोय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीकोणातुन सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बाजीराव मसार, सतीश भसारकर यांचा नेतृत्वात शिष्ठमंडळाने नप मुख्याधिकारी रविंद्र राऊत यांची भेट घेऊन ज्वलंत विषयावर चर्चा करून या संदर्भात लेखी निवेदन पत्र देऊन तात्काळ महसुल विभाग (आर. आय, तलाठी) कार्यालय जुन्या नगर परिषद कार्यालय इमारत मध्ये कायमस्वरुपी स्थानांतरित करण्याची मागणी केली आहे.
यामुळे लोकांना योग्य सोय, रस्त्यावर असल्यामुळे जाण्या – येण्यास उपयुक्त होईल, तसेच पटवारी व आर.आय अधिकारी सहज पने लोकांना भेटतील . लोकांची मागणी लक्ष्यात घेता मुख्याधिकारी रविंद्र राऊत यांनी लोकांच्या भावना समजुन घेत लवकरात लवकर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन नागरिकांना दिले आहे.
या प्रसंगी ऋषभ बावनकर ,दिपक कुंभारे , शरद वाटकर ,शक्ती पात्रे , कुंदन रामगुंडे ,अशोक मेश्राम , शेषराव बावणे,सुरेश खेरगडे सह आदि नागरिक उपस्थित होते.