Sunday, December 22, 2024
Homeराज्यवृत्तपत्र व्यवसाय कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी…सहाय्यक कामगार आयुक्तांच्या अहवालाचा दिला संदर्भ…

वृत्तपत्र व्यवसाय कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी…सहाय्यक कामगार आयुक्तांच्या अहवालाचा दिला संदर्भ…

आकोट – संजय आठवले

राज्याचे सहायक कामगार आयुक्त यांचे समितीने वृत्तपत्र व्यवसायातील सर्वच घटकांकरिता कल्याणकारी मंडळ स्थापनेबाबत राज्य शासनास सादर केलेल्या अहवालानुसार राज्य शासनाने वृत्तपत्र व्यवसाय कल्याणकारी मंडळ स्थापन करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना शाखा आकोट यांनी केली आहे.

या संदर्भात आकोट शाखेतर्फे तहसीलदार आकोट यांचे मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे निवेदन पाठविण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे कि, राज्यातील तीन लक्ष वृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रतिनिधित्व करणारी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना ही एकमेव संघटना आहे.

ही संघटना गत पंधरा वर्षांपासून वृत्तपत्र व्यवसायातील सर्व घटकांकरिता कल्याणकारी मंडळ स्थापनेचा आग्रह करीत आहे. सहाय्यक कामगार आयुक्त मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या अभ्यास समितीने याबाबत अनुकूल अहवाल राज्य शासनास दिलेला आहे.

त्यानुसार त्वरित हे मंडळ स्थापण्यात यावे. वृत्तपत्र व्यवसायातील सर्वच घटकांची असंघटित कामगार म्हणून नोंद करावी. आरोग्य शैक्षणिक, निवृत्ती वेतन अशा योजना लागू करण्यात याव्यात, गठई कामगारांचे धर्तीवर मोक्याचे ठिकाणी वृत्तपत्र विक्री स्टॉल उपलब्ध करून द्यावेत.

या मागण्यांचे निवेदनावर प्रकाश आमले नितीन खांडेकर संजय कुलकर्णी , गणेश लोणकर, भरत बंगाळे, संजय जोशी, गिरीश कथले, गणेश अवचार, प्रशांत ठोसर, सतीश देशमुख, रविकांत पालखडे, अजय शर्मा, कैलास बुभळकर, जितेश गंगातीरे, विष्णू शर्मा, जयंत कथले, सरफराज खान, रितेश नाथे, गोपाळ देशमुख, गोपाळ हिंगणकर, संतोष विणके, स्वप्निल सरकटे यांच्या स्वाक्षऱ्याआहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: