पातुर – निशांत गवई
शहरात मिलिंद नगर चौकात हुतात्मा स्मारक असून या हुतात्मा स्मारकाची गेल्या काही दिवसापासून दैनिक अवस्था झाली आहे या हुतात्मा स्मारकाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने या हुतात्मा स्मारकाची अवस्था वाईट झाली आहे या हुतात्मा स्मारकाला कोणते बँरीकेट नसल्याने कुत्रे डुकरे बकऱ्या यासारखे जनावरे हुतात्मा स्मारकाजवळ घाण करीत आहेत.
देशाच्या स्वतंत्र काळाचे प्रतीक म्हणून उभे असलेले या हुतात्मा स्मारकाची दयनीय अवस्था झाली आहे या हुतात्मा स्मारकावर देशाचे अशोक चक्र चे चिन्ह असल्यावर सुद्धा स्थानिक प्रशासन व महसूल विभाग या हुतात्मा स्मारकाच्या दैनिक अवस्थेबाबत अनभिज्ञ असल्याने या हुतात्मा स्मारकाचा व अशोक चक्राचा अवमान होत असल्याने नागरिकांमध्ये रोज व्यक्त केल्या जात आहे.
पातूर शहरातील हुतात्मा स्मारकाची शासकीय निधीतून तात्काळ रंग रगोटी दुरुस्ती व बॅरेकेटीग करावी व या ठिकाणी मोकाट जनावरांचा वावर होणार नाही याचा बंदोबस्त करावा अशी मागणी माजी सैनिक प्रमोद खंडारे व सामाजिक कार्यकर्ते अमोल बागडे यांनी पातुर चे तहसिलदार यांना एका निवेदनाद्वारे केली आहे