खेट्री येथील प्रकार : अभियंतांचा प्रताप…
पातूर – निशांत गवई
पातुर पंचायत समिती अंतर्गत खेट्री येथे अनेक शेतकऱ्यांनी चंदनची लागवड केली आहे. परंतु चंदन लागवडीचे देयक काढण्यासाठी पातुर पंचायत समितीच्या अभियंताकडून पैशाची मागणी होत असल्याचा आरोप खेट्री येथील शेतकरी कृष्ण आप्पा डहाळे, मोहम्मद हयात, शेख कदीर, मोहम्मद खान, शेख शब्बीर यांनी २३ ऑगस्ट रोजी पातूरचे तहसीलदार यांच्याकडे दिलेल्या तक्रारीतून केला आहे.
चंदन लागवडीचे मस्टर एमबी बनविण्यासाठी अभियंता यांच्याकडून तीन ते पाच हजार रुपयांची मागणी होत आहे.चंदन लागवडीचे देयक काढण्याबाबत शेतकऱ्यांनी अभियंता याची भेट घेतली असता,त्यांनी सांगितले की पैशे दिल्याशिवाय काम होत नाही, असा आरोप तक्रारीद्वारे करण्यात आला आहे.
अभियंताकडून शेतकऱ्यांना उडवा उडवीचे उत्तरे दिली जात असून,अनेक शेतकरी चंदन लागवडीच्या देयकापासून अनेक महिन्यापासून वंचित आहे. याबाबत शेतकऱ्यांनी संबंधिताकडे वारंवार तक्रारी केल्या परंतु संबंधिताकडून अद्यापही दखल घेण्यात आली नाही याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेणे गरजेचे आहे.
तहसीलदारांनी मागविला स्पष्टीकरण
चंदन लागवडीचे देयक काढण्यासाठी अभियंताकडून पैशाची मागणी होत असल्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारीवर तहसीलदारानी तत्काळ अहवाल व स्पष्टीकरण मागविला आहे. यावर काय कारवाई होते. याकडे खेट्री वासियंचे लक्ष लागले आहे. याबाबात अभियंता यांच्याशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही
चंदन लागवडीचे देयक काढण्यासाठी संबंधिताकडे वारंवार तक्रारी केल्या परंतु संबंधिताकडून अद्यापही दखल घेतली गेली नसल्याने अभियंता यांच्याकडून पैशाची मागणी होत आहे. त्यामुळे आम्ही अनेक महिन्यापासून चंदन लागवडीचे देयकापासून वंचित आहे. मोहम्मद हयात वंचित शेतकरी खेट्री