सांगली प्रतिनिधी :–ज्योती मोरे
म्हैशाळ ताकारी उपसायोजना व जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सूर्यकांत मारुती नलवडे व बांधकाम व्यवसायिक राहुल कनेगावकर यांना नुकतेच एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने अटक केली हि बातमी वार्यासारखी जिल्हाभरात पसरली परंतु या बातमी मागचे वास्तव पाहता या प्रकरणाची जर कसुन चौकशी केली तर एकूण त्यांच्या कार्यकाळात म्हैशाळ उपसा सिंचन विभाग सांगली या कार्यालयास शासनाकडून आलेल्या निधी पेक्षा जास्त सूर्यकांत नलवडे यांचे संपत्ती आढळुन येईल. त्यांच्याकडे एवढी संपत्ती जमा कशी झाली व स्थावर मालमत्ता कुठून आली याची वास्तविक पाहता चौकशी करायला हवी, त्याचबरोबर त्यांच्यासोबतअसलेले सहकारी व इतर कर्मचारी अनेक ठेकेदार यांनी सुद्धा अशा प्रकारे गैरप्रकार गैर व्यवहार करून करोडोची संपत्ती निर्माण करून त्या संपत्तीच्या जोरावर सर्वसामान्य जनतेला किंवा तक्रारदारास पायदळी तुडवले जाते.
सदर कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलावडे हे अनेक वर्षापासून म्हैसाळ उपसा सिंचन विभाग सांगली येथे अनेक राजकीय मंडळींच्या आश्रेयाने ठाण मांडून बसलेले असून त्या माध्यमातून त्यांनी आपण कल्पना करू शकणार नाही एवढे मोठे आर्थिक व जंगम मालमत्तेचे मायाजाळ तयार केले असून त्यांच्या कार्यकाळात म्हैसाळ उपसा सिंचनाचे जेवढे कामे झाली त्यापैकी जास्तीत जास्त कामे स्वतःच्या व भावाच्या व नातेवाईकांच्या नावे टेंडर काढली गेली असून सदर कामासाठी लागणारे मटेरियल हे स्वतःच्या कंपनीतून वापरले जाते व ते मटेरियल अत्यंत निकृष्ट दर्जाचे असते स्वतःखात्याचे वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे कोणी तक्रार केली तर त्या तक्रारीची कोणत्याही प्रकारचे चौकशी केली जात नाही कारण टेंडर काढणारे स्वतः कामाची क्वालिटी तपासणारे स्वतः व बिल काढण्यासाठी स्वतः वरिष्ठ पदावर असल्यामुळे तक्रारदार फक्त तक्रार करून जातो काम निकृष्ट दर्जा झालेले असते बिल मात्र दीडपट दराने उचलले जाते.
असे होत असताना त्यांना न जुमानता खंडेराजुरी ब्रम्हनाथ तलाव ते गवळेवाडी ला जाणारी पाईपलाईन ही जवळपास तीन कोटी रुपये चे काम त्यांनी स्वतःचे नातेवाईक असणारे वसंत खोत त्यांना देऊन सदर पाईपलाईन साठी लागणारे पाईप हे स्वतःच्या सह्याद्री कंट्रक्शन च्या एजन्सी कडून खरेदी करून सदर पाईप निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे पूर्ण पाईपलाईन लिकेज असल्याचे आमचे निदर्शनास आल्यामुळे आम्ही काही महिण्यापूर्वी म्हैशाळ उपसा सिंचन विभाग वारणाली सांगली येथे संबंधित कामाच्या ठेकेदाराच्या विरोधात चौकशीसाठी आंदोलनस बसलो असता त्यांनी व त्यांच्या सहकार्याने आम्हास जीवे मारण्याची धमकी देऊन आमचं तुम्ही काही करू शकत नाही तुम्हाला सोडणार नाही अशा प्रकारचे वक्तव्य करून आमचे आंदोलन मोडीस काढून सदर कामाचे पूर्णपणे बिल त्यांनी अदा करून घेतले व त्यानंतर त्या कामाची फक्त डागडुजी करून ती तक्रार तिथेच दाबण्यात आली.
अशा शासनाची आणि जनतेची दिशाभूल करून स्वतः मोठे आर्थिक मायाजाळ निर्माण करून सर्वसामान्य जनतेला किंवा तक्रारदाराला साम दाम दंड वापरून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या अधिकाऱ्याची व त्यांचे सर्व संबंधित कॉन्ट्रॅक्टर नातेवाईक व सह्याद्री कंट्रक्शन या नावाने त्यांची असणारी एजन्सी व त्यांचे बंधू चंद्रकांत नलावडे यांना चौकशीसाठी तात्काळ ताब्यात घेऊन कुपवाड लक्ष्मी मंदिर जवळ सह्याद्री कंट्रक्शन चे आलिशान ऑफिस बेळंकी येथे शंभर एकर जागेवरती पाईप फॅक्टरी लिंगनुर येथे आलिशान फार्म हाऊस बेळंकी येथे हॉट मिक्स प्लांन्ट व क्रेशर प्लॉन्ट.इतर अनेक मोठमोठे उद्योग व्यवसाय अनेक ठिकाणी रिअल इस्टेट मोठमोठाली महागडी वाहने व न इन्शुरन्स भरलेली कागदपत्रे अपुरी शासनाचे नियम धाब्यावर बसवून मनमानी कारभार करत व्यावसायिक वाहने सर्व व्यवसाय हे नियम बाह्य जीएसटी टॅक्स न भरता रसरसपणे व्यवसाय सुरू असतात त्यामुळं त्यांची खातेनिहाय चौकशी करून स्थावर जंगम मालमत्तेची व सह्याद्री कंट्रक्शनची ई.डी. मार्फत चौकशी करावी.अशी मागणी राष्ट्र विकास सेना पक्षच्या वतीने प्रशांतभाऊ सदामते यांनी जिल्हाधिकारी ,लाचलुचपत विभाग,आयकर विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.