नांदेड – महेंद्र गायकवाड
जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले अव्वल कारकून महाजन यांच्यामुळे गौण खनिजाचे अवैध उत्तखन्न होत असून शासनाचे लाखोचे महसूल बुडत असल्याने त्यांची चौकशी करून निलंबीत करण्याची मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
गेल्या १० ते १२ वर्षांपासून श्री महाजन हे नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालयात महसुल विभागात (गौण खनिज) अव्वल कारकुन म्हणून नौकरीवर असुन ते पाच ते सहा वर्षांपासून एकच ठिकाणी कार्यरत आहेत.च्या कार्यकाळात जिल्हयातील गौण खनिजाचे अवैध उत्खन्नन व वाळुची चोरटी वाहतुक मोठया प्रमाणात चालु आहे तसेच संबंध जिल्हयातील वाळु माफीया सोबत त्यांचे ‘आर्थिक हितसंबंध असल्याचे निवेदनात म्हण्टले आहे.
जिल्हा प्रशासनातील व तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांना अंधारात ठेवुन ते वाळु माफीया, दलाल यांच्या सोबत छुपे आर्थिक व्यवहार करीत असल्याने शासनाचे महसुल मोठया प्रमाणात बुडत आहे व करोडेचे शासनाचे नुकसान होत आहे.
श्री महाजन हे गेल्या अनेक वर्षांपासून महसूल विभागात एकाच ठिकाणी कार्यरत असल्याने सर्व गौण खनिज उत्खन्नन करणारे माफीया त्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे त्यांच्या मोबाईलचे कॉल डिटियल्स, फोन पे, गुगल पे व बँकेचे खाते तपासण्यात यावे. अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
श्री महाजन यांच्यामुळे गौण खनिजाचा काळा बाजार मोठया प्रमाणात चालत आहे. श्री महाजन यांची तात्काळ सखोल चौकशी करुन त्यांना निलंबित करावे अन्यथा आपल्या कार्यालयासमोर लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने आंदोलन व उपोषण करण्यात येईल. असा इशारा बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ कसबे दाताळकर यांनी
निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री,महसूलमंत्री,विभागीय आयुक्त यांना दिला आहे.