महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आत्मसन्मान मंच चे अध्यक्ष नित्यानंद शर्मा यांनी पत्र लिहून केली पंतप्रधान मोदी यांच्या दिवंगत आई हिरा बा यांचे स्मारक बनवण्याची मागणी केली आहे.. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रात नित्यानंद शर्मा यांनी म्हंटले आहे की,
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्री आदरणीय
” हीरा बा ” यांचे नुकतंच निधन झाले आहे.. या महान मातोश्रींच्या निधनामुळे संपूर्ण देशात दुःखाचे वातावरण आहे.. आदरणीय “हिरा बा” यांनी पंतप्रधान मोदी यांना फक्त जन्मच नव्हे तर कठीण त्यांना योग्य संस्कार देऊन या भारतमातेच्या सेवेसाठी आपल्या लाडक्या लेकाला समर्पित केलं..
घरची आर्थिक स्थिती हालाखीची असताना सुद्धा आपला प्रतिभाशाली मुलगा नरेंद्र मोदींना देशासाठी समाजासाठी निस्वार्थी होऊन सेवा करणे हेच आद्यकर्तव्य असे संस्काराचे धडे दिले अश्या थोर आईच्या कर्तृत्वाचा सन्मान म्हणून “हिरा बा” यांचे स्मारक महाराष्ट्रात होणे आवश्यक आहे.. अश्या थोर हिरा बा चे स्मारक समाजातील इतर मातांना आणि सर्वांनाच प्रेरणादायी ठरू शकेल.
आणि म्हणूनच “आत्मसम्मान मंच” ची राज्य सरकार कडे मागणी आहे की मुंबई गुजरात हाईवे (मीरा भाईंदर) या ठिकाणी स्वर्गवासी राष्ट्रमाता “हिराबा ” यांचे भव्य-दिव्य स्मारक बनवावे.. जे समाजातील सर्वांसाठी प्रेरणादयी राहील…