Sunday, December 22, 2024
Homeराज्यपातूर | तडीपार आरोपीकडून खंडणीची मागणी; गुन्हा दाखल...

पातूर | तडीपार आरोपीकडून खंडणीची मागणी; गुन्हा दाखल…

पातूर – निशांत गवई

एका वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार असलेल्या आरोपीने अनधिकृतपणे जिल्ह्यात प्रवेश करत खंडणी मागितल्याची घटना घडली आहे. दि.16/08/2024 रोजी सकाळी 03/00 वा. दरम्यान आरोपी शिवा दत्तात्रय निलखन वय अंदाजे 30 वर्ष. रा शिर्ला अंधारे हा पातूर येथील रहिवासी असलेल्या शिवसेना उपजिल्हा प्रमुख सागर रामेकर यांच्या घरी जाऊन त्यांना आवाज देऊन उठविले असता सागर रामेकर यांनी त्यास काय काम आहे कशाला आला आहेस असे विचारले असता आरोपी शिवा निलखन याने त्याच्या कमरेला लागलेला चाकु दाखवत मला दोन दिवसात 50000/- रु. दे अन्यथा तुला जीवे मारून टाकीन असे म्हणत खंडणी मागितली.

दरम्यान काल दी.16/8/2024 रोजी सागर रामेकर यांनी पातूर पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार दिली असता सदर प्रकरणाची गंभीरता पाहता अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दखल घेत पातूर पोलिसांना तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले असून आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 अनव्ये कलम 308(4) नुसार खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी शिवा हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

शिवा निलखन याच्यावर याअगोदर देखील अनेक गुन्हे दाखल असून एका प्रकरणात तो एका वर्षासाठी अकोला जिल्ह्यातून तडीपार केलेला असूनदेखील कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली करीत त्याने अनाधिकृतपणे जिल्ह्यातील प्रवेश करीत शिवसेना (उ.बा.ठा.) उपजिल्हा प्रमुख सागर रामेकर यांना खंडणी मागून पातूर शहरातील गुन्हेगारीत आपले वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न केला.

पातूर शहरात गल्लोगल्ली दादा,भाईंचा ऊत आला असून हे गावगुंड आठ-दहा भंटोलांना सोबत घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करीत असताना दिसतात अशा “टपऱ्या दादांचा” कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी कठोर पाऊल उचलून यांची वरात काढून समाजातून त्यांची दहशत कमी करणाची गरज आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: