नांदेड
भारत देशात प्रवासी वाहतूक क्षेत्रात मोठी क्रांती घडवणाऱ्या वंदे भारत या जलदगती रेल्वे गाडीच्या मार्गात पवित्र पावन स्थळ हजुरसाहेब नांदेड रेल्वे स्थानाकास जोडण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र सिख असोसिएशन मुंबई तर्फे करण्यात आली.
रविवार, दि. 22 सप्टेम्बर रोजी महाराष्ट्र सिख असोसिएशन मुंबईचे समन्वयक स.मलकीत सिंघ बल यांच्या नेतृत्वात दि. 22 सप्टेंबर रोजी एका शिष्टमंडळाने केंद्रीय गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांची भेट घेऊन हि मागणी केली आहे.
यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ विजय सतबीर सिंघ यांची ही उपस्थिती होती. महाराष्ट्र सिख असोसिएशनचे मुख्य संयोजक सरदार दलजीत सिंघ बल यांनी वरील विषयी माहिती देताना सांगितले की सध्या वंदे भारत रेल्वेच्या माध्यमातून देशाच्या प्रमुख केंद्रांना जोडण्याचे कार्य प्रगतिपथावर आहे. देशातील अनेक धार्मिक स्थळांना वंदे भारतच्या मार्गाने जोडण्यात येत आहे. नांदेड येथील सचखंड श्री हजुरसाहेब या तीर्थंस्थळाला लाखोंच्या संख्येत भाविक भेट देतात. जर वंदे भारतच्या मार्गात नांदेडचा समावेश केला गेला तर भाविकांना आणी मराठवाड्यातील नागरिकांना त्याचा लाभ मिळेल. केंद्रीय गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांनी हि मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिले असे दलजीत सिंघ बल आणि मालकितसिंघ बल यांनी सांगितले आहे
वंदे भारत मुळे लाभ : वंदे भारत रेल्वेगाडीला नांदेड जोडले गेले तर त्यामुळे वाहतूक क्षेत्रात क्रांती घडून येईल यात दुमत नाही. व नांदेड ते मुंबई प्रवास सहा तासात पूर्ण होऊ शकते. तसेच शिर्डी आणी इतर धार्मिक क्षेत्राच्या दर्शनासाठी भाविकांना सोयी उपलब्ध होतील. यामुळे मराठवाड्यातील प्रवाशीयांना , व्यापाऱ्यांना कमी वेळात आपले ठिकाण गाठता येईल नवीन रेल्वे मार्ग विकसित होण्यास मदत मिळेल.
वंदे भारत मुळे नांदेड ते अमृतसर सोळा तसात गाठणे शक्य होईल. तसेच दक्षिण राज्यातील मोठ्या महानगराना एका दिवसात भेट देणे देखील शक्य होणार आहे. शिवाय कोलकाता व पूर्वोत्तर राज्यांना कमी वेळात पोहोचणे शक्य होईल.