दिल्लीतील इंडिया गेट ते रिंगरोडला जोडणाऱ्या प्रगती मैदान बोगद्यात लुटमारीची घटना समोर आली आहे. शस्त्राच्या जोरावर चोरट्यांनी डिलिव्हरी एजंटकडून दोन लाख रुपये लुटले. रोख रक्कम घेऊन तो कॅबने गुरुग्रामला जात होता. नवी दिल्ली जिल्ह्यातील टिळक मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही समोर आले आहे.
नवी दिल्ली जिल्ह्याचे पोलिस उपायुक्त प्रवण तायल यांनी सांगितले की, पटेल साजन कुमार चांदनी चौकातील ओमिया एंटरप्रायझेसमध्ये डिलिव्हरी एजंट म्हणून काम करतात. तो त्याचा मित्र जिगर पटेल याच्यासोबत शनिवारी संध्याकाळी गुरुग्रामला दोन लाख रुपये देण्यासाठी जात होते. रिंगरोडवरून प्रगती मैदान बोगद्यात प्रवेश करून काही अंतरावर गेल्यावर दोन दुचाकींवर आलेल्या चार चोरट्यांनी शस्त्राच्या जोरावर टॅक्सी जबरदस्तीने अडवली. यानंतर चोरट्यांनी रोख रक्कम भरलेली बॅग लुटली. पटेल साजन कुमार यांच्या तक्रारीवरून टिळक मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. रविवारी सायंकाळपर्यंत चोरट्यांचा सुगावा लागला नव्हता.
या घटनेवरून अरविंद केजरीवाल यांनी एलजीचा राजीनामा मागितला आहे. तुम्ही दिल्ली सुरक्षित करू शकत नसाल तर जबाबदारी आमच्यावर द्या, असे ते म्हणाले. दिल्लीचे संरक्षण कसे आहे ते आम्ही तुम्हाला दाखवू.
खाली व्हिडीओ पाहा…
CCTV में कैद : प्रगति मैदान टनल में चलती कार को रोका, गन दिखाकर दिनदहाड़े लूट pic.twitter.com/mgL7rLTItu
— NDTV India (@ndtvindia) June 26, 2023