Sunday, December 22, 2024
Homeराजकीयदेगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचाच बालेकिल्यात केवळ; १९९०, २०१९ व २०२१ शिवाय...

देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचाच बालेकिल्यात केवळ; १९९०, २०१९ व २०२१ शिवाय इतर निवडणुकीत १०००० च्या आतच मताधिक्य आहे…

खतगावकरांचा बालेकिल्ला तरी ही विरोधकांचे मते तेवढीच.

बिलोली – रत्नाकर जाधव

देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. परंतु या मतदारसंघात १९७८ ते २०२१ पर्यतच्या निवडणुकांचा निकाल बघितला तर १९९० व २०१९,२०२१ च्या निवडणुकीच्या निकाला शिवाय इतर निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना १०,००० च्या आतच मताधिक्य आहे.

तर २०२१ च्या पोटनिवडणुकीत जरी काँग्रेसला मताधिक्य मिळाले विशेष म्हणजे भास्करराव खतगावकरांचा बालेकिल्ला असला तरी विरोधी उमेदवारांच्या मतामध्ये घट झाली नाही.सध्याच्या गचाळ राजकीय परिस्थिती मध्ये काँग्रेसला मताधिक्य कायम ठेवण्यात कसरत करावी लागणार आहे.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.त्यामुळे राजकीय हालचालीना वेगळा आला आहे. परंतु राज्यात गेल्या पाच वर्षात ज्या पद्धतीचे गचाळ राजकीय परिस्थिती निर्माण झाली आणि समजावादी आणि हिंदुत्वच्या विचारसरणी ही कालबाह्य झाली आहे.

आणि गेली चाळीस वर्ष एकमेकांच्या विरुद्ध गरळ ओकणारे राजकीय पक्ष एकमेकांच्या दावणीला जाऊन बसले आहेत.त्यामुळे महायुती व महाविकास आघाड्या तयार झाल्या आणि जागा वाटपाचे खलबते सुरु झाले.यात युती व आघाडीतील पक्ष आपापल्या मतदारसंघात उमेदवारीचा दावा करत आहेत.तशीच परिस्थिती देगलूर विधानासभा मतदारसंघाची आहे.

१९७८ ते २०२१ या कालावधीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ७ वेळा,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (U) १ वेळा, जनता पार्टीने १ वेळा,जनता दलाने १ वेळा व शिवसेने १ वेळा नेतृत्व केले आहे.तसा हा मतदारसंघ २००४ पर्यन्त बिलोली विधानसभा म्हणून होता परंतु २००९ मध्ये हा मतदारसंघ राखीव तर झालच त्याच बरोबर या मतदारसंघांच्या नावात बदल करण्यात येऊन बिलोली विधानसभा ऐवजी देगलूर विधानसभा मतदारसंघ असा बदल करण्यात आला.

पूर्वीच्या बिलोली विधानसभा मतदारसंघात १९७८ ते २००४ पर्यन्त काँग्रेसची विविध विरोधी राजकीय पक्षाशी लढत झाली. त्यात १९७८ साली काँग्रेसचे बळवंतराव चव्हाण यांची लढत जनता पार्टीचे गंगाधरराव पाटणे(४१८८७) यांच्या सोबत झाली यात यांनी बळवंतराव चव्हाण(३३११६) यांचा ८७७१ मतांनी पराभव केला.१९८० च्या निवडणुकीत भारतीय काँग्रेस आय (U ) चे उमेदवार बळवंतराव चव्हाण(३५६९३) यांच्याशी झाली यात खतगावकर(३५२१२) यांचा बाळावंतराव चव्हाण ४८१ मतांनी पराभव केला. १९८५ च्या निवडणुकीत भारतीय काँग्रेसचे गंगाधरराव कुंटूरकर यांची लढत भारतीय काँग्रेस (एस )चे बळवंतराव चव्हाण यांच्याशी झाली.

यात काँग्रेसचे कुंटूरकर (४६३६०) यांनी काँग्रेस(एस ) बळवंतराव चव्हाण (३६६१३)यांचा ९७४७ मतांनी पराभव केला. १९९० च्या निवडणुकीत काँग्रेसचे भास्करराव पाटील खतगावकर आणि जनता दलचे गंगाधरराव पटणे यांच्यात लढत झाली. यात खतगावकर (७५५१२)यांनी पटणे (३५६१२) यांचा तब्बल ३९९०० मतांनी पराभव केला.

१९९५ च्या निवडणुकीत काँग्रेसचे भास्करराव पाटील खतगावकर व शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्यात लढत होऊन खतगावकर (६१४१२) यांनी शरद जोशी (५३०६६) यांचा ८३४६ मतांनी पराभव केला. १९९९ च्या निवडणुकीत जनता दलाचे गंगाराम ठक्करवाड व काँग्रेसचे गंगाधरराव कुटूंरकर यांच्यात लढत झाली यात ठक्करवाड (३६४४३) यांनी कुटूंरकर (३४९५६) यांचा १४८७ मतांनी पराभव केला.तर २००४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे भास्करराव खतगावकर व भाजपाचे गंगाराम ठक्करवाड यांच्यात लढत झाली.

यात खतगावकर (५९६३९) यांनी ठक्करवाड (५१४२१) यांचा ८२१८ मतांनी पराभव केला.बिलोली विधानसभा मतदारसंघ य नावाने ही शेवटची निवडणूक झाली. त्यानंतर २००९ पासून बिलोली विधानसभा हा देगलूर विधानसभा म्हणून घोषित झाला तसा हा मतदारसंघ ही अनुसूचित जातीसाठी राखीव झाला.

हा मतदारसंघ हा खतगावकरांच्या विजयी हॅट्रिकमुळे “दादांचा ” मतदारसंघ म्हणून ओळखू लागला त्यामुळे खतगांवकरांचे अनुसूचित जातीतील अनेक कार्यकर्ते असतांना ज्यांना राजकारणातील ” र” माहित नव्हता असा मुबंईहुन नवखा असलेल्या उमेदवार रावसाहेब अंतापूरकर यांना विधानसभेच्या मैदानात उतरून निष्टावंतांची निराशा केली. २००९ साली आरक्षित झालेल्या य मतदारसंघात वाजतागायत तीन निवडणुका झाल्या यात २००९ ला काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर व शिवसेनेचे सुभाष साबणे यांच्यात लढत झाली.

यात २००९ साली रावसाहेब अंतापूरकर (६४४०९) यांनी सुभाष साबणे (५८३१९) यांचा ६०११) मतांनी पराभव केला. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत पुन्हा सुभाष साबणे विरुद्ध रावसाहेब अंतापूरकर अशीच लढत झाली.यात सुभाष साबणे (६६८५२) यांनी रावसाहेब अंतापूरकर (५८२०४) यांचा ८६४८ मतांनी पराभव केला.यावेळी भाजपा व शिवसेना हे दोघे ही वेगळे लढले होते.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत खतगावकरांना उमेदवारी नाकारली होती त्यामुळे त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. विशेष म्हणजे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा उमेदवार असतांना ही खतगावकरांनी शिवसेने सुभाष साबणे यांना शेवटच्याक्षणी मदत केली त्यामुळे साबणे यांनी अंतापूरकर यांच्यावर मात केली.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा रावसाहेब अंतापूरकर व सुभाष साबणे यांच्यात लढत झाली.या निवडणुकीत भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार साबणे असतांना व खतगावकर भाजपात असतांनाही साबणे यांच्या विरुद्ध अंतापूरकर यांना अप्रत्यक्ष मदत केली. त्यामुळे अंतापूरकर (८९४०७) यांनी साबणे (६६९७४) यांचा २२४३३ मतांनी पराभव केला.दुर्दैवाने रावसाहेब अंतापूरकर यांचा कोरोनाकाळात निधन झाल्याने पोट निवडणूक लागली.

यामध्ये काँग्रेसने रावसाहेब अंतापूरकर यांचे पुत्र जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली.दरम्यान यावेळी भाजपाची साथ सोडत खतगावकरांनी पुन्हा काँग्रेस प्रवेश केला व आणि सुभाष साबणे यांनीही शिवसेनेची साथ सोडत भाजपात प्रवेश करत पोटनिवडणूकीत उमेदवारी दाखल केली.

विशेष म्हणजे या निवडणूकीत दाजीभावजींनी (चव्हाण/ खतगावकर ) यांनी निवडणूक हातात घेत काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांच्यासाठी जंगजंग पछाडले त्यामुळे जितेश अंतापूरकर यांनी (१,०८,८४०) सुभाष साबणे (६६९०७) यांचा तब्ब्ल ४१९३३ मतांनी पराभव केला.

परंतु एकंदरीत २००९ पासूनच्या निवडणुकीत साबणे यांना (२००९ ला ५८३९८, २०१४ ला ६६८५२, २०१९ ला ६६९७४ व पोटनिवडणूक २०२१ ला ६६९०७) पडलेल्या मतांच्या आकडेवारी वरून सुभाष साबणे यांना पडलेल्या मतांमध्ये घट झाली नाही.त्याच बरोबर १९७८ ते २०२१ य काळतील १९९०,२०१९ व २०२१य काळतील निवडणुकाशिवाय इतर निवडणुकीत काँग्रेसला १०,००० च्या आतच मताधिक्य असल्यामुळे त्यामुळे व २०२४ च्या लोकसभा निवडणुकी पासून मतदारांनीच निवडणूक हातात घेतल्यामुळे व बदलत्या राजकारणात समजवाद व हिंदुत्ववाद हा कालबाह्य झाल्यागत असल्यामुळे सध्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला व भाजपालाही मतदारांच्या रोशाला सामोर्य जावं लागणार आहे.

त्यातल्या त्यात या भागाचे स्वतःला सर्वोसर्वा समजून घेणारे माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर यांची २०१४ पासून स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी सतत करत असलेल्या पक्षांतरामुळे या मतदारसंघात त्यांच्याबद्दल रोष निर्माण झाला आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: