Tuesday, July 16, 2024
spot_img
Homeराज्यपहिल्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस मानांकन स्पर्धेत पुरुषांच्या गटात दीपित पाटिल ठाणे...

पहिल्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस मानांकन स्पर्धेत पुरुषांच्या गटात दीपित पाटिल ठाणे व महिलांच्या गटात श्रुती अमृते ठाणे प्रथम…

सांगली – ज्योती मोरे.

सुरज फाउंडेशन मार्फत घेण्यात आलेल्या पहिल्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस मानांकन स्पर्धा दिनांक 19 ते 23 जुलै 2023 या कालावधीत आयोजित केल्या आहेत गेले दोन दिवस खुला गट पुरुष व महिला यांच्या स्पर्धेला सुरुवात झाली होती त्याचा आज बक्षीस वितरण प्रसंगी मा डॉक्टर बसवराज तेली सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते करण्यात आला.

सदर स्पर्धेमध्ये एकूण 900 खेळाडू सहभागी झाले होते दिनांक 19 व 20 खुला गट पुरुष व महिलांच्या स्पर्धा होत्या त्यामध्ये पुरुषांच्या गटांमध्ये दिपित पाटील ठाणे व महिलांच्या गटामध्ये श्रुती अमृते ठाणे प्रथम क्रमांक पटकावून यश संपादन केले याप्रसंगी संस्थेचे सचिव माननीय एन जी कामत तसेच मा. संगीता पागणीस डायरेक्टर सुरज फाउंडेशन

मा. विनायक जोशी इन्चार्ज सुरज स्पोर्ट्स अकॅडमी मा. अधिकराव पवार प्राचार्य नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मा.रघुनाथ सातपुते एडमिन ऑफिसर मा.मधु लोणारे रेफ्री महाराष्ट्र राज्य असोसिएशन हे उपस्थित होते सदर बक्षीस समारंभ नंतर सुरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मार्फत कृष्णा व्हॅली टेबल टेनिस अकॅडमी ची उद्घाटन डॉ.बसवराज तेली सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते करण्यात आले.

या खेळाचे इतर अकॅडमी सुरू केले असून भविष्यात ते राज्य राष्ट्रीय खेळाडू तयार व्हावे यासाठी दर्जेदार प्रशिक्षक नियुक्त केले आहेत त्यासाठी आपण संपर्क करावा तसेच सदर स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:–

उप उपांत्य फेरी
श्रेया देशपांडे(ठाणे) विजयी विरुध्द समृद्धी कुलकर्णी(सोलापूर) 11/7,9/11,11/8,11/7
श्रुती अमृते (ठाणे) विजयी विरुध्द मानसी चिपळूणकर (मुंबई शहर) 11/8,11/7,11/8
स्वप्नाली नरले(पुणे) विजयी विरुध्द आर्या सोनगडकर(ठाणे) 10/12,11/6,11/7,11/2
पृथा वर्टीकर(पुणे) विजयी विरुध्द सेनहोरा डिसूझा (मुंबई शहर) 13/11,11/4,11/8
उपांत्या फेरी
श्रुती अमृते (ठाणे) विजयी विरुध्द श्रेया देशपांडे(ठाणे) 5/11,11/7,11/8,11/13,12/10,8/11,12/10
पृथा वर्टीकर(पुणे) विजयी विरुध्द स्वप्नाली नरले(पुणे) 11/6,11/6,11/8,11/6

अंतिम फेरी
श्रुती अमृते (ठाणे) विजयी विरुध्द पृथा वर्टीकर(पुणे) 7/11,11/5,11/7,9/11,12/10,11/8

उप उपांत्य फेरी
मंदार हर्डीकर (मुंबई उपनगर) विजयी विरुध्द शुभम आंब्रे (मुंबई शहर) 11/6,8/11,11/6,13/11
दीपित पाटील (ठाणे) विजयी विरुध्द पार्थव केळकर (मुंबई शहर) 13/11,8/11,12/10,11/7
सिद्धांत देशपांडे (ठाणे) विजयी विरुध्द सिद्धेश सावंत (ठाणे) 11/5,9/11,11/9,5/11,11/9
चिन्मय सोमय्या (मुंबई उपनगर) विजयी विरुध्द सिद्धेश पांडे (ठाणे) 13/11,11/5,11/13,11/13,11/5

उपांत्य फेरी – दीपित पाटील (ठाणे) विजयी विरुध्द मंदार हर्डीकर(मुंबई उपनगर) 8/11,11/7,11/4,15/13,11/6
चिन्मय सोमय्या (मुंबई उपनगर) विजयी विरुध्द सिद्धांत देशपांडे (ठाणे) 11/8,11/5,10/12,11/7,10/12,12/10

अंतिम फेरी – दीपित पाटील (ठाणे) विजयी विरुध्द चिन्मय सोमय्या (मुंबई उपनगर) 11/8,11/9,11/6,11/9

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: