Deepfake : अश्लील चित्रे आणि व्हिडीओचा बाजार खूप मोठा आहे, गेल्या काही वर्षांपासून तो सतत फोफावत आहे. एका रिपोर्टनुसार डीपफेकचा वापर करून बहुतांश अश्लील व्हिडिओ बनवले जातात. हा तोच डीपफेक आहे ज्यातून अभिनेत्री आणि राष्ट्रीय क्रश रश्मिका मंदान्नाचा व्हिडिओ तयार करण्यात आला होता. रश्मिकाचा चेहरा दुसर्या महिलेच्या शरीरावर चढवून सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
रश्मिका मंदान्नाचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांना आवाहन देता गुरुवारी अमरावती पोलिसांनी x वर ट्विट करत AI Deepfake बदल वाचून राहण्याची माहिती दिली. ट्विट मधे फोटो उपलोड करत लिहिले कि Al (Artificial Intelligence) च्या वाढत्या वापरामुळे AI हे अधिक बळकट होत चालले आहे. फसवणुक करणारे त्याचा उपयोग चुकीच्या गोष्टींसाठी करत असल्याचे दिसून आले आहे.
Deep Fake अँप वापरून चेहरे बदलून अश्लील व्हिडिओ बनवणे, सोशल मीडियावर बदनामी करणे, बनावट चेहऱ्याचा वापर करून व्हिडिओ कॉल करणे, एखाद्या व्यक्तीचा हुबेहूब आवाज काढणे अशा असंख्य गोष्टीसाठी सायबर हॅकर याचा वापर करीत आहेत अशा फ्रॉड ऍक्टिव्हिटीला नागरिकांनी बळी पडू नये.
— Amravati Rural Police-अमरावती ग्रामीण पोलीस (@AmtRuralPolice) November 16, 2023
1. सोशल मीडियावर आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नका.
2. अनोळखी व्यक्तींपासून आपण फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्रामवर सोशल प्रोफाईल्स हाईड ठेवा.
3. सोशल मीडियावर कोणतीही माहिती शेअर करण्याआधी त्यामधील सत्यता पडताळा.
4. अशी कोणतीही ऍक्टिव्हिटी दिसून आल्यास संपर्कासाठी जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा १९३० क्रमांकावर कॉल करा.