खामगाव – हेमंत जाधव
राष्ट्रीय अध्यक्ष मा.आ.विजयराज शिंदे यांच्यासह बुलडाण्यात गुरव समाज बांधवांच्या वतीने अर्थसंकल्पाचे जल्लोशात स्वागत
राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी आज सभागृहात राज्याचा सर्व समावेशक अर्थसंकल्प सादर केला.या अर्थ संकल्पात गुरव समाजाच्या उन्नतीसाठी महामंडळ स्थापण करण्याची घोषणा करून या महामंडळास प्राथमिक स्वरूपात ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची घोषणा केली आहे.
याची घोषणा होताच आज दि.९.०३.२०२३ रोजी बुलडाणा येथील गुरव समाज बांधवांनी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.आ.विजयराज शिंदे यांच्यासह जनसंपर्क कार्यालय शिवालय येथे फटाके फोडून जल्लोष व्यक्त केला व सरकारच्या समर्थनार्थ घोषणा बाजी करीत अर्थसंकल्पाचे स्वागत केले.
राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या वतीने सोलापूर येथे म्हासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.आ.विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात भव्य दिव्य महाधिवेशन घेण्यात आले होते.या अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब ,महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील,माजी मुख्यमंत्री श्री सुशीलकुमारजी शिंदे यांच्यासह खासदार, आमदार यांचीही उपस्थिती होती.या अधिवेशनात मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांनी गुरव समाजाच्या उन्नती साठी संत काशीबा महाराज गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा करून त्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद सुद्धा जाहीर घोषनेत केली होती.
त्याचीच वचनपूर्ती म्हणून आज राज्याचे अर्थ मंत्री तथा उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी राज्याचा अर्थ संकल्प मांडला व त्यात गुरव समाजासाठी “संत काशीबा महाराज युवा गुरव आर्थिक विकास महामंडळ” स्थापनेची व त्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतुदीची सभागृहात घोषणा करून गुरव समाजाच्या विकासाचे एक दालन खुले केले आहे.
या निमित्त गुरव समाज लोकसेवा ट्रस्टच्या वतीने एकत्र येऊन फटाके फोडून पेढे वाटून जल्लोष व्यक्त केला तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.आ.विजयराज शिंदे यांचे आभार व्यक्त केले.
गुरव समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष
माजी आमदार विजयराज शिंदे साहेब यांचे गुरव समाज लोकसेवा ट्रस्टच्या वतीने आभार मानण्यात आले त्याबद्दल तमाम समाज बांधवांच्या वतीने शिंदे – फडणवीस सरकारने जाहीर आभार व्यक्त केले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख श्यामजी घोरपडे यांच्या घरासमोर जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी उपस्थिती गुरव समाज लोकसेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत मेंदूरकर ,उपाध्यक्ष संजय पारखेडकर , कोषाध्यक्ष गजानन खंडार, सहसचिव प्रफुल्ल बाळापुरे, उपजिल्हाप्रमुख श्याम घोरपडे, मार्गदर्शक दिनकरराव तायडे, चंद्रकांत वानखडे, गजानन आळेकर, शरदजी शिंदे, जनम दांडगे, शिवा घोरपडे,
युवा कार्यकर्ते सचिन वानखडे, निशांण जराड, ओम खंडार ची अथर्व वानखडे चि प्रतीक घोरपडे ची ललित घोरपडे महिला भगिनी सौ राणी मेंदूरकर सौ शुभांगी घोरपडे सौ स्मिता वानखडे, सौ सुकेशनी वानखडे सौ रुक्मिणी मेंदूरकर सौ वनवाला घोरपडे सौ साहू शिंदे सौ शांती घोरपडे कु. योगिता घोरपडे कु.अक्षरा घोरपडे कुमारी सताक्षी जराव गुरव समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.