Monday, December 23, 2024
Homeराजकीयवारणाली भुयारी पादचारी मार्गाबाबत अधिवेशनानंतर तोडगा काढू आ. सुधीर गाडगीळ यांची नागरिकांना...

वारणाली भुयारी पादचारी मार्गाबाबत अधिवेशनानंतर तोडगा काढू आ. सुधीर गाडगीळ यांची नागरिकांना ग्वाही…

सांगली – ज्योती मोरे.

वारणाली येथील उड्डाण पुलाखाली रेल्वे फाटकाजवळ भुयारी पादचारी मार्गाचे काम सुरू आहे. याला परिसरातील नागरिकांनी विरोध केला आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांनी शनिवारी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी केली. स्थानिक नागरिक, अधिकारी यांच्याशी संवाद साधला. दरम्यान याबाबत अधिवेशनानंतर रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेऊ. याबाबत सकारात्मक तोडगा काढू अशी ग्वाही आमदार गाडगीळ यांनी नागरिकांना दिली.

वारणाली येथील रेल्वे उड्डाण पुलाखाली भुयारी पादचारी मार्गाचे काम सुरू आहे. रेल्वे गेट तसेच परिसरातील पोलीस लाईन, विद्याविहार कॉलनी, वारणाली झेड.पी कॉलनी, अष्टविनायकनगर , जिजामाता कॉलनी,किर्लोस्कर कॉलनी, जयहिंद कॉलनी, ट्रॉफिक ऑफिस परिसरातील नागरिकांंच्या दृष्टीने हा मार्ग गैरसोयीचा असल्याचे आरोप होत आहेत. नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. काम बंद करण्याची मागणी रेल्वे प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.

दरम्यान शनिवारी आमदार सुधीर गाडगीळ यांनी प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी केली. स्थानिक नागरिकांची मते जाणून घेतली. यावेळी नागरिकांनी विश्रामबाग रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रशासनाचा डाव असल्याची तक्रार आमदार गाडगीळ यांच्याकडे केली.

नागरिकांच्या भावना लक्षात घेत आमदार गाडगीळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. दरम्यान आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन झाल्यानंतर तातडीने रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊ. यामध्ये सकारात्मक तोडगा काढू अशी ग्वाही आमदार गाडगीळ यांनी नागरिकांना दिली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: