नांदेड – महेंद्र गायकवाड
प्रत्येक वर्षी 18 डिसेंबर हा दिवस जिल्हा प्रशासनाच्यावतीने “अल्पसंख्याक हक्क दिवस” म्हणून राबविण्यात येतो. त्याअनुषंगाने सोमवार 18 डिसेंबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सकाळी 11 वाजता सदर कार्यक्रमास व्याख्याता म्हणून गुरूद्वारा सचखंड बोर्ड नांदेडचे समुदाय अधिकारी मनदिपसिंघ टाक व जिल्हा व सत्र न्यायालय नांदेडचे अॅड सय्यद अरिबुद्दीन हे संबोधित करणार आहेत. अल्पसंख्यांक समाजातील नागरीकांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
संयुक्त राष्ट्र संघटनेने दिनांक 18 डिसेंबर 1992 रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्काचा जाहीरनामा स्विकृत करून प्रस्तृत केला आहे. त्यानुसार अल्पसंख्याक नागरिकांना त्यांची संस्कृती, भाषा, धर्म, परंपरा इत्यादींचे संवर्धन करता यावे यादृष्टीने प्रयत्न करण्याबाबत राष्ट्रीय आयोगाने सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक वर्षी 18 डिसेंबर हा दिवस जिल्हा प्रशासनाच्या वतीने “अल्पसंख्याक हक्क दिवस” म्हणून राबविण्यात येतो.
अल्पसंख्याक विकास विभाग मंत्रालय मुंबई यांचे परिपत्रक दिनांक 29 नोव्हेंबर 2023 नुसार अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव / माहिती देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत असे सूचना प्राप्त आहेत. तसेच या दिवसाच्या निमित्ताने अल्पसंख्यांकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काबाबत जाणीव किंवा माहिती करून दिली जाणार आहे.