Monday, December 23, 2024
Homeराज्यअकोला | इंदुमती ट्रॅव्हल्स मुळे झाला अपघात...तलाठी थोरात यांचा मृत्यू...

अकोला | इंदुमती ट्रॅव्हल्स मुळे झाला अपघात…तलाठी थोरात यांचा मृत्यू…

अकोला शहरातील निमवाडी भागात उतरणारा उड्डाण पूल येथे आज शनिवारी सकाळी सकाळी च इंदुमती ट्रॅव्हल्स मुळे अपघात झाला असून शहरातील उमरी भागात राहणारे तलाठी नीलकंठ थोरात यांचा या अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

इंदुमती ट्रॅव्हल्स कंपनीची गाडी क्र एम एच ०९ई एम ७३४१ या गाडीचे गाडीच्या मागील भागजवळ असलेले टूल बॉक्स चे झाकण उघडले गेल्याने नीमवाडी भागात उड्डाण पूल सुरु होत असलेल्या ठिकाणी अपघात झाला असून यामध्ये शहरातील उमरी भागात राहणारे तलाठी नीलकंठ थोरात यांचा या अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

हया घटनेनंतर खदान पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघाताची माहिती घेऊन ती इंदुमती ट्रॅव्हल्स ची गाडी पोलिस ठाण्यात आणली असून मृतक थोरात यांना सरवोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे व पोलिस अधिक तपासासाठी गुंतले आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: