Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीनरखेड वनपरिक्षेत्र येथे बिबट चा मृत्यू...

नरखेड वनपरिक्षेत्र येथे बिबट चा मृत्यू…

नरखेड वनपरिक्षेत्र, नरखेड उपवनक्षेत्र, खापरी नियत क्षेत्रात दिनांक:- 09/01/2023 ला 05 राखीव वन मध्ये मृत बिबट गस्त दरम्यान दिसून आले. नरखेड वनपरिक्षेत्र चे कर्मचारी सकाळी 08:00 च्या सुमारास गस्त करीत असताना उपवनक्षेत्र नरखेड नियतक्षेत्र खापरी, मधील 05 राखीवना मध्ये अंदाजे 6-8 वर्ष वया चे बिबट मृत असल्याचे दिसून आल्यामुळे संपुर्ण क्षेत्राची पाहणी करण्यात आली.

प्राथमीक अपराध सुचना क्रमांक 04952/123778 दिनांक- 09/01/2022 वन्यजिव अधिनियम 1972 अनुसुची 1 कलम 9 व कलम 39 व 51 अन्वये नोंदविला व वरिष्ठ अधिकारी यांना कळविण्यात आले. तसेच नरखेड वनपरिक्षेत्र चे कर्मचारी यांनी NTCA च्या मार्गदर्शन सुचना नुसार कार्यवाही केली. मृत बिबट चे सर्व अवयव सबुत असल्याचे दिसून आले. घटना स्थळी नागपूर वनविभाग चे सहा. वनसंरक्षक श्री. पी. डी. पालवे, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. डी. एन. बल्की,

नरखेड परिक्षेत्रातील सर्व अधिनस्त वनकर्मचारी मौका स्थळी उपस्थित होते. तसेच NTCA प्रितिनिधी श्री. उधमसिंग यादव मानद वन्यजीव संरक्षक, श्री. नितीन जोशी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे समक्ष पंचनामा तयार करण्यात आला असुन शवविच्छेदन डॉ. सुदर्शन काकडे पशु वैधकीय अधिकारी T. T. C. नागपूर, डॉ. आर. एम. बोईटे पशुधन वैधकीय अधिकारी सावरगांव, यांनी केला.

प्राथमिक माहिती नुसार बिबट कुजलेल्या स्वरूपात असल्याने मृत्यू चे कारण स्पष्ट झाले नाही. फॉरेन्सिक करीता नमुने घेण्यात आले असुन न्याय वैधकीय तपाणी करीता नागपूर येथे पाठविण्यात आले. याकरीता मा. श्री. रंगनाथ नाईकडे, मुख्य वनसंरक्षक नागपूर वनवृत्त यांचे मार्गदर्शना खाली उपवनसंरक्षक डॉ. श्री. भरत सिंह हाडां, श्री डी. एन. बल्की वनपरिक्षेत्र अधिकारी नरखेड यांनी कार्यवाही केली असुन पुढील तपास श्री. पी. डी. पालवे सहा. वनसंरक्षक नागपूर स्थित काटोल हे करित आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: