नरखेड तालुक्यातील बेलोना शिवारातील घटना…
नरखेड – अतुल दंढारे
शेतात संत्राच्या झाडाला पाणी ओलण्याकरता गेलेला युवकाला विद्युत करंट लागल्याने मृत्यू झाला. युगल गजानन बारमासे वय 17 रा. बेलोना असे युवकाचे नाव असून शेतात तो आपल्या आई सोबत गेला होता.
विद्युत पुरवठा कमी जास्त प्रमाणात होत असल्याने वारंवार मोटर पंप बंद चालू होत असल्या होत असल्याचे जाणवल्याने लाईन मध्ये बिघाड आहे का हे बघण्याकरता तो पेटीवर जवळ गेला करंट चेक करत असतानाच शॉक लागल्याची बातमी कळताच आजूबाजूच्या शेतातील शेतकरी मोठ्या संख्येने धावून गेले तोवर त्याचा मृत्यू झाला होता. लागली शेतकऱ्याने पोलिसांना माहिती दिली.
पोलीस उपनिरीक्षक महेश बोथले सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले व वीजपुरवठा उप कार्यकारी अभियंता अभिजीत घोडे शाखा अभियंता सलीम शेख यांना माहिती दिली ते सुद्धा घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून सविच्छेदनाकरिता पाठवले. युगल हा तीन बहिणींना एकुलता एक भाऊ व गजानन बारमासे यांना एकच मुलगा होता युगल हा नेहमीच धार्मिक कार्यात अग्रेसर असल्याने मोठ्या प्रमाणात दुःख व्यक्त होत आहे.
त्याच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे शेतकऱ्यांना दिवसा बारा तास विद्युत पुरवठा गरज असताना मात्र मात्र आळीपाळीने आठ तास वीज पुरवठा होत असतो कधी दिवसा कधी रात्री त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी उलट मोठे अडचण निर्माण होते युगल च्या मृत्यूला कोण जबाबदार? हा प्रश्न मात्र शेतकऱ्यांसमोर तिथे उपस्थितान समोर निर्जीव म्हणून उभा राहिला. यूगलच्या मृत्यूची जबाबदारी वीज पुरवठा विभाग घेणार का?