Sunday, December 22, 2024
Homeराज्यडोंबिवली येथे उच्च्भ्रू गृह संकुल परिसरात चिमुकल्याचा मृत्यू...

डोंबिवली येथे उच्च्भ्रू गृह संकुल परिसरात चिमुकल्याचा मृत्यू…

कल्याण – प्रफुल्ल शेवाळे

डोंबिवली मानपाडा पोलीस ठाणे हद्दीमधील उच्च्भ्रू समजल्या जाणाऱ्या रिजन्सी अनंतम येथील प्लेझोन मध्ये खेळणाऱ्या एका पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सक्षम उंडे असं या चिमुकल्याचे नाव आहे.. दिनांक ३१ऑक्टोबर च्या संध्याकाळी सक्षम क्लब हाऊस मध्ये खेळण्यासाठी आला होता..

खेळत असताना सक्षम हा प्लेझोन मधून खाली पडला…प्लेझोन परिसरात काम करणाऱ्या कामगारांनी तात्काळ सक्षम ला एम्स रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले असता डॉक्टरानी उपचारापूर्वी त्याला मृत घोषित केले.

सदर घटने प्रकरणी मानपाडा डोंबिवली पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आली आहे… आणि पोलीस पुढील तपास करत आहेत.. सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे..

Prafulla Shewale
Prafulla Shewalehttp://mahavoicenews.com
मी, प्रफुल्ल शांताराम शेवाळे, रा. टिटवाळा ता. कल्याण जि. ठाणे, पदवी - विद्युत अभियंता, विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रात 20 वर्षे अनुभव. पत्रकारिता गेल्या 7 वर्षापासून करतो, मी महाव्हाईस न्यूज ला गेल्या पाच वर्षापासून परिसरातील बातम्या देण्यासाठी नेहमीच सहकार्य करतो...
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: