Monday, December 23, 2024
Homeराजकीयअज्ञात वाहनाच्या धडकेत भारतीय सेना सेवारत सैनिकाचा मृत्यू अंतविधीस सलामी न मिळाल्यामुळे...

अज्ञात वाहनाच्या धडकेत भारतीय सेना सेवारत सैनिकाचा मृत्यू अंतविधीस सलामी न मिळाल्यामुळे नाराजीचा सूर…

लोणार – सागर पनाड

लोणार तालुक्यातील येसापुर येथे भारतीय सेना दोन मराठा लाईट इन्फंट्री चा जवान विकास गायकवाड यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत भानापूर जवळ अपघात घडल्या ने मृत्यू झाला व गाडी चालवणारा मित्र किशोर शंकर धांडे जखमी असून मेहकर येथे उपचार घेत आहे.

सैनिकाच्या अपघातात मृत्यूची बातमी मित्रांना समजतात मिलिटरी हॉस्पिटलला पाठवण्यास आग्रह धरत होते परंतु हेल्मेट तुटून गाडी चढवून गेलेला अपघात खूप भयानक होता जवळपासचे सेवार्थ सैनिक मदतीला पोहोचले परंतु सर्व निष्फळ ठरले आमदार डॉ. संजय रायमुलकर साहेबांनी घटनेची माहिती सरकारी सूत्रांना दिली व आर्मीलाही देण्यात आली.

सकाळी शाई इतमामात अंतविधी होईल असे वाटले परंतु सकाळी उशिरापर्यंत आर्मी किंवा पोलीसच्या कोणत्याही जवानाची सलामीसाठी गाडी आली नाही त्यामुळे येसापूर सह परिसरातील लोकांमध्ये नाराजीचा सूर ऐकावयास मिळाला . खासदार प्रतापराव जाधव आमदार डॉ. संजय रायमुलकर यांचे उपस्थितीत साधेपणाने अंत्यविधी झाल्याने या प्रकारचा सैनिक मित्र फाऊंडेशन देऊळ गाव राजा तर्फे तिव्र संताप व निषध व्यक्त करण्यात आला. मृतक सैनिकाच्या पश्चात आई-वडील पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: