वाडेगांव – ग्रामविकास अधिकारी घरकुल योजना कामासंदर्भात कामचुकारपणा तसेच उडवाउडवीची उत्तरे देत असल्यावरुन विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कार्यालय समोर दिनांक २१ जुन पासून आमरण उपोषणाला बसले आहेत.
बाळापूर तालुक्यातील मोठे गाव असलेल्या वाडेगाव येथील ग्रामविकास अधिकारी यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी बाबत विचारणा केली असता उडवा उडवीचे उत्तरे देत आहेत आणि त्याचप्रमाणेम, ग्रा. वि. अ. ग्रामपंचायत प्रशासनास घरकुल योजनेच्या कामा बाबत कोणत्याही प्रकारे कामाचे नियोजन करीत नसल्याचे माझे निदर्शनास आले आहे.
म्हणून खुद्द ग्राम पंचायत सदस्य यांचे ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. आज दिनांक २२ जून रोजी,उपोषण स्थळी वंचीत चे युवा नेता गोपाल भाऊ राऊत . प्रकाश कंडारकर. डां. हिम्मतराव घाटोल. दत्ता मानकर. विकास सदांशिव. वाय एस पठाण . सागर सरप. सर. चेतन कारंजकर. गणेश अहीर. यांनी भेट दिली.
आज पर्यंत घरकुल योजने संदर्भात कर्मचारी यांचे सोबत घरकुल कागद पत्राची पुर्तता करण्यासाठी सभा आयोजीत केल्या नाहीत. त्यामुळे वाडेगांव येथील लाभार्थी घरकुल योजने पासुन वंचित राहिल्यास त्यास ग्रा. वि. अ. स्वतः जाबबदार आहेत. तसेच ज्या नागरीकांच्या घरकुल फाईल ग्रा. पं. मध्ये आहेत त्या पुढे पाठविण्यात आल्या नाहीत.
मी ग्रा.वि. अधिकारी वाडेगाव यांना दिनांक १५ जून २०२३ ला स्मरण पत्र दिले आहे परंतु आत्ता पर्यंत मला त्यांच्या कडून अपेक्षित उत्तर मिळाले नाही. दिनांक २० जून २०२३ पर्यंत घरकुल योजनेच्या सर्व कामे मार्गी लावले नाहीत त्यामुळे राजेश्वर अरूण पळसकार ग्रामपंचायत सदस्य व माझे सहकारी सतिश श्रीधर सरप ग्रामपंचायत प्रशासना विरूध्द २१ जून २०२३ ला पासुन ग्रामपंचायत कार्यालया समोर आमरण उपषोणास बसणार असल्याचे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या पत्रामध्ये नमूद आहे.