OBC समाज रस्त्यावर…. मुंबई चे पाणी तोडण्याचा आणि मुंबई महामार्ग रोखून ठेवण्याचा इशारा…शासनाकडून अद्याप कोणतीही दखल नाही…
शहापूर – प्रफुल्ल शेवाळे
शहापूर तालुक्यातील वालशेत गावातील ओबीसी बांधव मा. भरत निचिते संविधान दिनी ओबीसी समाज्याच्या मागण्या आणि मराठा समाज आणि ओबीसी यांच्या मध्ये फूट पाडण्यासाठी जे सरकारच धोरण आहे, यासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाला पाच दिवस झाले. परंतु शासनाने कोणतीही दखल घेतली नाही. ना शासनाचा कोणताही प्रतिनिधी या उपोषण स्थळी आलेला नाही..
या उपोषणास अनेक संघटनानी,नेत्यांनी विविध समाजातील लोकांनी पाठिंबा दिला असून. अगदी हाकेच्या अंतरावर असून सुद्धा आपण आपला प्रशासन दखल घेत नसेल तर,आम्हाला आमच्या हक्कासाठी पुढील पाऊल उचलण्याची वेळ आली आहे.
मुंबई नाशिक हायवे तसेच शहापूर तालुक्यातून मुंबई ठाण्याला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन बंद करू. एक थेंबही पाणी येऊन देणार नाही. शहापूर तालुक्यातीलच नव्हे तर पूर्ण ओबीसी समाजाला न्याय मिळाला नाही तर… परिणामी मुंबई नाशिक महामार्ग बंद करू अशी भूमिका ओबीसी बांधवानी घेतली आहे.
मराठा समाज आणि ओबीसी समाजात जो काही वाद/विवाद निर्माण झाला आहे तो लवकरात लवकर मिटवा. गुण्या गोविंदाने नांदणाऱ्या समाजाला गुण्यागोविंदाने नांदुद्या. अशी भूमिका ओबीसी समाजाकडून घेतली जात आहे..
दरम्यान आज च्या शहापूर तालुका बंद च्या पार्शवभूमीवर शहापूरात तसेच संपूर्ण तालुक्यात ओबीसी समाज रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसून येत होते. तालुक्यातील डोळखांब, शेणवा,आसनगाव,वासिंद, किन्हवली,खर्डीसह तालुक्यातील मुख्य बाजारपेठा पूर्ण बंद होत्या.