Monday, December 23, 2024
Homeसामाजिकदशरथ दीक्षांत यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमाने केला साजरा...

दशरथ दीक्षांत यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमाने केला साजरा…

कोल्हापूर – राहुल मेस्त्री

सध्याच्या काळात वाढदिवस साजरा करणे ही एक फँशन बनली आहे.यामध्ये अनेकजन वायफळ पैसा खर्च करून वाढदिवस साजरा करतात.पण याला अपवाद ठरत कोल्हापूर वंचित बहुजन आघाडीचे माजी उपाध्यक्ष दशरथ दीक्षांत यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत कोल्हापूर महापालिकेच्या सावित्रीबाई फुले हाँस्पिटल मधील रुग्णांना खाऊ वाटप व काही प्रमाणात औषधाची मदत करून आपला वाढदिवस साजरा करण्यात आला.

या केलेल्या कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.त्याचबरोबर शहरातील रस्त्यावर भटकंती करणाऱ्या नागरिकांनाही जिवनावश्यक वस्तूचे वितरण करण्यात आले..सदर कार्यक्रम वंचित बहुजन युवा आघाडी, करवीर राधानगरी व कोल्हापूर शहर यांच्या वतीने घेण्यात आला.

याप्रसंगी कोल्हापूर शहर उपाध्यक्ष प्रवीण बनसोडे ,सचिव अमित नागटिळे, तालुकाध्यक्ष प्रवीण कांबळे ,करवीर तालुकाध्यक्ष नितीन कांबळे, माजी जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळे, प्रशांत कांबळे, डॉ.आकाश कांबळे, राकेश कांबळे, डॉ.पावरा सर यांच्यासह हॉस्पिटल कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: