काल बुधवारी छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे बुधवारी झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 10 जवान शहीद झाले. या हल्लाचा एक video सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होतोय, जो स्फोटानंतरचे क्षण दाखवत आहे. व्हिडीओमध्ये एक पोलीस शिपाई पोझिशनमध्ये येताना आणि नंतर स्फोट घडवणाऱ्या माओवाद्यांना प्रत्युत्तर देताना दिसत आहे. हा Video अनिल शर्मा यांच्या Twitter वर पोस्ट केला आहे.
हा व्हिडिओ घटनास्थळी उपस्थित असलेल्या अन्य एका पोलीस कर्मचाऱ्याने शूट केला आहे, जो स्फोटानंतर दुसऱ्या वाहनाच्या मागे लपून नक्षलवाद्यांशी लढत होता. व्हिडिओमध्ये बंदुकीच्या गोळ्या ऐकू येत आहेत- “उड गया, पुरा उड गया.” याचा अर्थ- संपूर्ण वाहन उडवण्यात आले आहे.
वाहन 100 ते 150 मीटर अंतरावर होते
एका वृत्तवाहिनीला पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले की तो आणि इतर सात जवान स्फोट झालेल्या USV च्या मागे होते. आमचे वाहन 100 ते 150 मीटर मागे होते. जवानाने सांगितले की, सुरक्षा अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार – संवेदनशील भागात अशा हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी टाळण्यासाठी, ताफ्यांमध्ये सुरक्षित अंतर राखले जाते.
स्फोटानंतरही नक्षलवादी आजूबाजूला आहेत का, असे विचारले असता, “आम्ही त्यांच्या दिशेने गोळीबार केला तेव्हा त्यांच्या बाजूने एक-दोन राऊंड गोळीबार करण्यात आला, त्यानंतर गोळीबार थांबला,” असे उत्तर पोलिस कर्मचाऱ्याने दिले.
IED स्फोटात 10 जवान शहीद
सुधारित स्फोटक उपकरणाने (IED) झालेल्या स्फोटात 10 जिल्हा राखीव रक्षक कर्मचारी आणि एक नागरिक चालक ठार झाला. जिल्हा राखीव रक्षकामध्ये माओवाद्यांशी सामना करण्यासाठी प्रशिक्षित स्थानिक आदिवासी पुरुषांचा समावेश असतो. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी एक मिनी माल व्हॅन भाड्याने घेतली होती. राज्याची राजधानी रायपूरपासून सुमारे 450 किमी अंतरावर झालेला हा स्फोट हा छत्तीसगडमधील गेल्या दोन वर्षांतील सर्वात मोठा माओवादी हल्ला आहे.