रामटेक – राजु कापसे
रामटेक राज्यामध्ये विविध भागात विविध लोकसंस्कृतीचे दर्शन घडते. महाराष्ट्र हे समृद्ध अशा लोक परंपरेने नटलेले राज्य आहे. वस्त्र संस्कृती, खाद्य संस्कृती, वाद्य संस्कृती व लोकसंस्कृती विविध प्रदेशानुसार बदलत गेलेली दिसून येते.
नमन, दशावतार, तमाशा ,शाहिरी, खडीगंमत, दंडार, झाडीपट्टी नाटक, कलगीतुरा, जाखडी खेळे इत्यादी लोककला प्रकार प्रसिद्ध आहेत. या लोककलेपैकी पूर्व विदर्भात प्रसिद्ध असलेले दंडार महोत्सव २०२४ चे उदघाटन कळमेश्वर जिल्हा नागपूर येथील आशीर्वाद सभागृहात मान्यवराच्या हस्ते दिनांक 26 मार्च २०२४ रोजी करण्यात आले.
विवीध सामाजिक विषयावर दंडार या लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्यात येतात. 3 दिवस रंगणाऱ्या या दंडार महोत्सवात विवीध विषयांचे समाज प्रबोधन होणार आहे. दंडार ही आपली लोकसंस्कृती असून जास्तीत जास्त प्रेक्षकांनी याचा आस्वाद घ्यावा याकरिता दंडार महोत्सव प्रेक्षकांसाठी विनामूल्य आहे त्यामुळे सर्वांनी यांचे आस्वाद घ्यावे असे आवाहन मान्यवरांच्या वतीने करण्यात आले.
आपल्या लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे या उद्देशाने शासनामार्फत विवीध महोत्सवाचे सादरीकरण करण्यात येत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तिनही दिवस या महोत्सवाचे सादरीकरण सायं.6:३० वाजता करण्यात आलेले आहे.
जय शक्ती दुर्गा मंडळ मरेगाव गाव तालुका लाखनी जिल्हा भंडारा ज्यांनी उत्तम दंडार केली सांस्कृतिक कार्य विभागाचे माननीय शेंडे साहेब विदर्भ शाहीर कलाकार परिषदे चे केंद्रीय कार्याध्यक्ष अलंकार टेंभुर्णे, जिल्हा सरचिटणीस अरुण भाऊ वाहने, वृद्ध कलावंत मानधन समितीचे सदस्य मनोहर धनगरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.