पातूर – निशांत गवई
शनिवार दिनांक १८ आणि १९ फेब्रुवारी २०२३ रोजी संपूर्ण गावाच्या वतीने साजरा करण्यात येत असलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज” यांच्या जयंती महोत्सवामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहेया स्पर्धेत स्वतः घरी अगणामध्ये गड किल्ले बांधणी स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा गट पहिला:- वर्ग १ ते ५गट दुसरा:- वर्ग ६ ते ८गट तिसरा :-वर्ग ९ आणि १०गट चौथा :- खुला गट. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःच्या घरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित प्रसंगांवर सुबक आणि आकर्षक चित्र रेखाटून सदरील चित्रे शुक्रवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ रोजी जिल्हा परिषद केंद्र शाळेचे मुख्याध्यापक संजय बर्डे गुरुजी यांच्याकडे जमा करावेत.
१४ वर्षे वयोगटावरील विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा सदर स्पर्धेसाठी दर्जेदार प्रश्नसंच काढून विद्यार्थी संख्या एवढ्या झेरॉक्स दानामध्ये शिवश्री प्रदीप लक्ष्मण गवई अकोला यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत सदर सामान्य ज्ञान परीक्षा, जिल्हा परिषद केंद्र शाळा दिग्रस बु!! येथील पटांगणामध्ये १८ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ९ वाजता तर सायंकाळी ७ वाजता जाहीर व्याख्यान मार्गदर्शक शिवश्री देविदास अंधारे ,वाशीम येथील 12 अंध कलाकार युवकांचा चेतन सेवांकुर आर्केस्ट्र दुपारी ४ ते ७ छत्रपती शिवाजी महाराज यांचे तैलचित्र लावून सजवलेल्या रथातून गावातील प्रमुख मार्गाने बँड,
लेझीम वाद्य वृंदासह वाजत गाजत शांततेच्या मार्गाने मिरवणूक रात्री ७ ते ८ बक्षीस वितरण कार्यक्रम जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच आशाताई सुधाकर कराळे, उपसरपंच सदानंद बराटे, पोलीस पाटील नितीन गवई, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुनील गवई, माजी उपसरपंच मनोज गवई, उत्सव समितीचे उपाध्यक्ष राजू पाटील टाले, सचिव सोनू पाटील ताले, सुखलाल ताले, विजय गुलाबराव पाटील, लक्ष्मणराव लहाने, संदीप गावंडे, बाळासाहेब बराटे, वैभव गवई, महादेवराव सरप, जेतवन बुद्ध विहाराचे अध्यक्ष माणिकराव गवई यांच्यासह उत्सव समितीचे पदाधिकारी पथक परिश्रम घेत आहेत..